कुरळप : कुरळप (ता. शिराळा) येथील मिनाई आश्रमशाळेतील सुविधांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करणाºया समाजकल्याणसह विविध विभागांच्या संबंधित अधिकाºयांची खातेनिहाय चौकशी केली जाईल. यामध्ये जो कोणी दोषी आढळून येईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. शाळेतील शेरे बुकात नोंद करणाºया अधिकाºयांनी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शाळेत घडणाºया सर्वच घटना अधिकाºयांना माहीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.कुरळप येथे मंगळवारी मिनाई आश्रमशाळेला त्यांनी भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे उपस्थित होते.नाईक म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. इतर शाळेत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. जर त्यांचा प्रवेश नाकारला गेला, तर संबंधित शाळेवर कारवाई केली जाईल, तसेच शिक्षकांच्या बाबतीतही योग्य निर्णय घेण्याविषयी सूचना शासनस्तरावर दिल्या जातील.यावेळी शिक्षक परिषदेचे माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन शाळेतील शिक्षकांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती करणार आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होईल.यावेळी रजनीकांत बल्लाळ, विजयकुमार माने, सतीश पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.राजकारण नको, तपास योग्य दिशेनेअत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर सात दिवसानंतर शिवाजीराव नाईक कुरळपमध्ये आले. हा प्रकार उघडकीस येऊन आजअखेर कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी घटनास्थळाकडे का फिरकला नाही, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर आ. नाईक म्हणाले की, या प्रकरणात कोणताही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी वरिष्ठस्तरावरून या घटनेविषयी माहिती घेत होतो. पोलीस यंत्रणेचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. नराधम अरविंद पवार याला पाठीशी घालण्याचे धाडस कोणीच करणार नाही.शिक्षक चौकशीच्या फेºयातलैंगिक शोषणाच्या प्रकरणात कोठडीत असलेला अरविंद पवार याची कसून चौकशी केली जात आहे. या गैरकृत्याबाबत सखोल चौकशी करून त्यामध्ये शिक्षकांचा काही सहभाग आहे का? याचीही चौकशी सुरू असल्याचे तपासाधिकारी शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी किशोर काळे यांनी सांगितले.
कुरळपप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी: शिवाजीराव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:03 AM