इस्लामपूर : अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक महाविद्यालय व धनवंतरी हॉस्पिटल, आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन राजारामबापू पाटील बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील व डॉ. प्रवीण पोरवाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे व नगरपालिकेचे आरोग्य सभापती विश्वनाथ डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरामध्ये ५५३ लोकांची निरनिराळी तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी ८ लोकांना पुढील उपचारासाठी आष्टा येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक बशीर मुल्ला, अभिजित मोमीन, रफिक पठाण, शकिल जमादार उपस्थित होते.
आष्टा येथील डॉ. सूरज चौगुले, डॉ. पंकज शहा, डॉ. सुशांत कणसे, डॉ. संजीवनी कटरे, अभिजित थोरात, सिद्धनाथ मदने व कर्मचारी यांनी शिबिर यशस्वितेसाठी प्रयत्न केले. या शिबिराचे संयोजन मंदार जाधव, अभिजित रासकर, प्रदीप यामगार, अमोल नाईक, व्यंकटेश रजपूत, प्रशांत यमगर, विनोद पाटोळे, अनिकेत अक्षय पवार यांनी केले.
फोटो : १७०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज
इस्लामपूर येथे महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील व डॉ. प्रवीण पोरवाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, डॉ. प्रवीण पोरवाल, अॅड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे उपस्थित होते.