आयुक्त कापडणीस यांनी नाट्यगृहात पूर्ण झालेली कामे व अद्याप अपूर्ण असलेल्या कामांची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. बालगंधर्व नाट्यगृह आवारातील निकामी वाहने, कचरा, भंगार काढून टाकण्यात आले असून परिसर चकाचक केला आहे. नाट्यगृहाच्या इमारतीतील आधार केंद्र, विद्युत विभागाचे साहित्य व घरपट्टी विभागाची कागदपत्रे २४ तासांत हलविण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
ऐतिहासिक बालगंधर्व नाट्यगृहाकडे यापुढे मनपाचे दुर्लक्ष होणार नाही, येथे आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील. नाट्यगृहात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल व लवकरच हे नाट्यगृह सुरू होईल, अशी ग्वाही आयुक्तांनी नाट्यप्रेमींना दिली.
या वेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, मोहन वाटवे, बाळासाहेब बरगाले, प्रशांत गोखले, ओंकार शुक्ल, श्रेयस गाडगीळ, राजेंद्र नातू, धनंजय जोशी, सुधीर गोखले, राजेंद्र सव्वाशे, मनोहर कुरणे उपस्थित होते.
फोटो-११मिरज१