तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे कुरळप पोलीस ठाण्याच्या वतीने वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गावरून परिसरातील गावांमध्ये जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची तपासणी कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर निर्बंध आले आहेत.
तांदूळवाडी येथील राष्ट्रीय महामार्गास परिसरातील कुंडलवाडी, ऐतवडे खुर्द, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव आदी गावांना जाण्याचा संलग्न पर्यायी मार्ग आहे. या गावांमध्ये प्रवास करताना लोकांनी मास्कचा वापर करूनच प्रवास करावा, असा उद्देश असल्याने येथे तपासणी करूनच सोडले जाते आहे. त्याचबरोबर वाहनधारकांचा वाहनपरवानाही तपासला जात आहे. या तपासणीत सहा पोलीस कर्मचारी, सहा होमगार्ड यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे स्वत: लक्ष देत आहेत.