शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

विमा कंपन्यांनी चुकविला १५ हजार कोटींचा कर, जीएसटीच्या कोल्हापूर कार्यालयाने पकडली चोरी 

By संतोष भिसे | Published: October 03, 2023 12:11 PM

विम्याच्या हप्त्यावर जीएसटी चुकविला

संतोष भिसेसांगली : देशभरातील विविध विमा कंपन्यांनी केंद्र सरकारला तब्बल १५ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा चुना लावल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७पासून विम्याच्या उलाढालीवर जीएसटी भरलेला नाही. केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर महासंचालनालयाच्या तपासणी मोहिमेत ही करचुकवेगिरी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाने ही देशव्यापी चोरी पकडली आहे.यासंदर्भात २७ जनरल इन्शुरन्स कंपन्यांना ७००हून अधिक नोटिसा काढण्यात आल्या आहेत. २०१७ ते २०२१ या चार वर्षांतील चुकविलेला वस्तू व सेवा कर त्वरित भरण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कंपन्यांचे धाबे दणाणले असून, जीएसटी परिषद व केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे धाव घेतली आहे. ही चोरी पकडण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर कार्यालयाकडून तपास सुरू होता. सुस्पष्ट धागेदोरे हाती लागताच देशव्यापी छाननीसाठी कार्यालयाने जीएसटी परिषद व अर्थ मंत्रालयाकडे परवानगी मागितली. ती मिळताच वेगाने छाननी सुरू केली.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून गुवाहाटीपर्यंतच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त अधिकारी यांना जबाबासाठी कोल्हापुरात पाचारण केले. त्यांनी करभरणा केला नसल्याचे कबूल केले. एकूण करचुकवेगिरीचा आकडा १५ हजार कोटींवर गेला. त्यावर व्याज व दंडही वाढणार आहे.यामध्ये आयुर्विमा कंपन्यांचा समावेश नाही. वाहनविमा, पीकविमा यांसारख्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांचा समावेश आहे. सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील बड्या कंपन्या, तसेच काॅर्पोरेट दर्जाच्या खासगी विमा कंपन्यांनी चुकवेगिरी केली आहे. विमा नियामक विकास प्राधिकरणाने याबाबत वेळीच पावले उचलली असती, तर ही करचुकवेगिरी झाली नसती, असा निष्कर्ष पुढे आला आहे.

विम्याच्या हप्त्यावर जीएसटी चुकविलाया कंपन्यांनी को-इन्श्युरन्स प्रीमिअमवर जीएसटी भरला नाही. री-इन्श्युरन्समध्ये मिळणाऱ्या कमिशनवरील जीएसटीही चुकविला. या कंपन्या बऱ्याच कालावधीपासून कोल्हापूर गुप्तचर महासंचालनालयाच्या रडारवर होत्या. कारवाईची चाहूल लागताच त्यांनी जीएसटी परिषदेकडे धाव घेतली; पण दिलासा मिळाला नाही. सध्या मार्च २०२१पर्यंतची छाननी झाली असून, मार्च २०२३पर्यंतच्या कराचा हिशेब अद्याप केलेला नाही.

टॅग्स :SangliसांगलीGST Officeमुख्य जीएसटी कार्यालयkolhapurकोल्हापूर