शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सांगली जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा कवच, सर्वसाधारण सभेतील आणखी घोषणा..जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Published: September 15, 2023 6:24 PM

सांगली : जिल्हा बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याच्या कर्जाला तीन वर्षासाठी दोन लाख रुपयांचे ...

सांगली : जिल्हा बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याच्या कर्जाला तीन वर्षासाठी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत केली. याशिवाय मयत शेतकऱ्याच्या दोन पाल्यास प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच शेती कर्जाच्या वसुलीसाठी सुरू केलेली एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला.सांगलीतील धनंजय गार्डनमध्ये जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, मोहनराव कदम, विशाल पाटील, संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड, सुरेश पाटील, तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, वैभव शिंदे, ॲड. चिमण डांगे, बी. एस. पाटील, बाळासाहेब होनमोरे, मन्सूर खतीब, सरदार पाटील, अनिता सगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते. यावेळी यंदा १०० टक्के कर्ज वसुली केलेल्या सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांचा सत्कार केला.मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांची संख्या दोन लाख ९० हजार इतकी आहे. या सर्व शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेकडून विमा उतरविण्यात येणार आहे. हप्त्याची रक्कम बँक भरणार असून कर्जदार शेतकऱ्यांना तीन वर्षासाठी अपघात विमा म्हणून दोन लाखाचे संरक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या दोन पाल्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदतही देण्यात येईल. अद्यापही अनेक शेतकऱ्यांची थकबाकी कायम आहे. त्यामुळे उर्वरित शेतकरी ओटीएस योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक