कडेगाव येथे ‘अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा’ या शासकीय मोहीम सुरू करण्यात आली. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, जे खरोखरंच गोरगरीब आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा गरीब गरजू लोकांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी सध्याचे जे सधन पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांनी अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडावे तरच खरोखरंच पात्र लाभार्थी असलेल्या गोरगरीब लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करता येऊ शकते. या योजनेत सहभागी होण्यासाठी रेशन दुकानदार यांच्याकडे नमुना अर्ज उपलब्ध करून देण्यात आला असून सक्षम कुटुंबप्रमुखाने अर्ज भरून द्यावा, असे तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी सांगितले. यावेळी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव, तालुका पुरवठा अधिकारी वसंत मिरजकर उपस्थित होते.