सांगली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनहून परतलेल्या पलूस तालुक्यातील एका व्यक्तीची आरोग्य तपासणी पूर्ण करून त्यास रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. यापूर्वीही एका व्यक्तीच्या सर्व तपासण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. आता अजून एक व्यक्ती चीनहून परतल्याने त्याच्याही सर्व त्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सर्तकता बाळगली जात आहे. विशेषत: चीनमधून आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष आहे. गेल्या आठवड्यात चीनहून आलेल्या एका व्यक्तीच्या प्रकृतीवर आरोग्य विभागाने लक्ष ठेवले होते. त्या व्यक्तीच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यास रूग्णालयातून सोडण्यात आले होते. त्यानंतर पलूस तालुक्यातील एका गावातील एक व्यक्ती चीनहून आल्याची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणेने त्याच्याही सर्व त्या तपासण्या पूर्ण करून घेतल्या. त्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याने त्यालाही रूग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.जिल्ह्णात नव्हे, तर राज्यातही कुठे कोरोना संशयित रूग्ण नसल्याने कोणीही घाबरण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. तरीही खबरदारी म्हणून सर्दी, ताप, कणकण असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चीनहून सांगलीत परतलेल्या दुसऱ्या व्यक्तीचीही तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:19 AM