शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

खुनाचा तपास उलट्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 12:34 AM

इस्लामपुरातील प्रकार : मुख्य पाच सूत्रधार पडद्याआड

 इस्लामपूर : येथील डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी डॉ. अरुणा यांच्या खुनामागचे गूढ अद्याप कायम आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. या गुन्ह्यातील आणखी पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पडद्याआड ठेवले आहे. या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, कपडे जप्त केले असले तरी, याला पंचनाम्यासाठी साक्षीदार मिळत नसल्याने गुन्ह्याचा तपास भरकटत चालला आहे. खून प्रकरणात रुग्णालयातील महिला मदतनीस सीमा यादव, तिचा प्रियकर नीलेश दिवाणजी व त्याचा मित्र अर्जुन पवार या तिघांचा फक्त मारेकऱ्यांनी कुलकर्णी यांच्या घरातील माहिती घेण्यासाठी व घरात प्रवेश मिळवण्यासाठी वापर करून घेतल्याचे समोर येत आहे. कुलकर्णी यांचा खून नियोजनबध्द केला आहे. त्यामागचे खरे गूढ पोलिसांना उलगडले आहे. परंतु याला ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे संशयितांची संख्या वाढत आहे. या गुन्ह्यात आणखी पाचजणांचा समावेश आहे. यामध्ये एकाकडून डॉ. कुलकर्णी यांच्याशी आर्थिक व्यवहार झाल्याचे कळते, तर हनुमाननगर, तिरंगा चौक, इंदिरा कॉलनी, रुग्णालय परिसर येथील प्रत्येकी एक अशा पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठोस पुरावे मिळाल्यानंतरच हे चेहरे समोर आणले जाणार असल्याचे पोलीस सांगत आहेत. ताब्यातील संशयितांची चौकशी केली असता, वेगवेगळी मते येत असल्याने तपास तिसरीकडेच भरकटत चालला आहे. (प्रतिनिधी) गुन्ह्यातील वस्तू जप्त गुन्ह्यात वापरलेल्या जवळजवळ १५ वस्तू जप्त केल्या असून, त्याचा पंचनामा करण्यासाठी साक्षीदार म्हणून काहींच्या साक्षी घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु यश आलेले नाही.