सांगली : शहरातील मार्केटयार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्सवर टाकण्यात आलेल्या दराेडा प्रकरणातील संशयितांचा पुन्हा एकदा शोध सुरू करण्यात आला आहे. सांगलीपोलिसांनी बिहारमध्ये जाऊन तपास करत या प्रकरणातील चौघांची नावे निष्पन्न केली होती. मात्र, हे संशयित पोलिसांच्या हाती लागले नव्हते. आता पुन्हा एकदा याचा तपास सुरू करण्यात आला आहे.मिरज रोडवरील रिलायन्स ज्वेल्सवर रविवारी (दि. ४ जून) भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून सहा कोटी ४४ लाख रुपयांची दागिने लंपास करण्यात आली होती. दरोड्यावेळी १४ कोटींहून अधिकचे दागिने लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानंतर ज्वेल्सच्या वतीने दिलेल्या फिर्यादीत साडेसहा कोटींची नोंद करण्यात आली होती.संपूर्ण राज्यात गाजलेल्या या प्रकरणाचा सांगली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. अत्यंत आव्हानात्मक बनलेल्या या प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न करण्यातही पोलिसांना यश आले होते.
चौघांची नावे निष्पन्न; आता शोध सुरूरिलायन्स ज्वेल्सवर अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून दरोडा टाकण्यात आला होता. पोलिसांसमोरही या प्रकरणाचे आव्हान होते. तरीही या प्रकरणाचा बिहार आणि नेपाळ सीमेपर्यंत जाऊन तपास करण्यात आला होता. यात गणेश भद्रावार (रा. हैदराबाद), प्रताप राणा (रा. वैशाली, बिहार), कार्तिक इनामदार (रा. हुगळी, बंगाल), प्रिन्सकुमार सिंह (रा. वैशाली, बिहार) यांची नावे निष्पन्न झाली होती.आता कसून शोधतपासात संशयितांची नावे निष्पन्न झाली असली तरी यातील कोणीही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. या टोळीकडून देशातील अनेक भागातही दरोडा टाकण्यात आल्याचेही समोर आल्याने त्यांना पकडण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. यामुळेच आता पुन्हा एकदा या संशयितांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
बिहारसह नेपाळपर्यंत तपासस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह ११हून अधिक पोलिसांची पथके या दरोड्याच्या तपासासाठी तयार होती. यानंतर एलसीबीच्या पथकाने बिहारमधील संशयितांचा भाग आणि अगदी नेपाळपर्यंत जाऊन माहिती घेतली. आताही पुन्हा एकदा हा तपास सुरू करण्यात आला आहे.