कोल्हापूर जिल्ह्यातील टोपपासून सांगली जिल्ह्यातील दिघंचीपर्यंत या महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामध्ये सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा आष्टा-वडगाव रस्ता मोठा करण्याचे काम गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. पण रस्त्यावर माती पसरून ठेवल्याने अनेक वाहने घसरून शेजारील शेतात जाऊन पलटी होत आहेत. यामध्ये शेतकरी तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.
सोमवारी कोल्हापूरहून तासगावला जाणारी एसटी या वरून खाली घसरली. सुदैवाने कोणती मोठी हानी झाली नाही. तसेच चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस वाहतूक करणारा मोठा डंपर रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाला. या रस्त्यावर रोज छोटे-मोठे अपघात घडतच आहेत. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांमधून वारंवार होत आहे.
फोटो-१४शिगाव०१
फोटो ओळ :
शिगाव (ता. वाळवा) येथून भादोले (ता. हातकणंगले) या रस्त्यावर कोल्हापूरहून तासगावला जाणारी एसटी रस्त्यावरून खाली घसरली.