शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मिरजेची सुधारित पाणीपुरवठा योजना रखडली

By admin | Published: November 04, 2014 10:13 PM

जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर काम : ४५ कोटींच्या योजनेचा खर्च ७० कोटींवर

सदानंद औंधे- मिरज -मिरज शहरासाठी सुधारित नळपाणी योजना रखडल्याने वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठ्यासाठी जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर मोठा ताण आहे. मिरजेच्या सुधारित नळपाणी योजनेला केंद्र शासनाच्या मंजुरीअभावी ४५ कोटींच्या नळपाणी योजनेचा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे. मिरज शहरासाठीची ५० हजार लोकसंख्येला नळ पाणीपुरवठा करणारी जुनी यंत्रणा शहरातील सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुरी ठरत आहे. जुन्या योजनेवर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण असल्याने शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, जीर्ण जलवाहिन्या फुटल्याने वारंवार पाणीपुरवठा खंडित होणे, असे प्रकार सुरू आहेत. मिरज शहरासाठी दररोज २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना २३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मिरजेत २० हजार ४७९ नळ जोडण्या आहेत. मिरजेतून दरमहा ३० लाख पाणी बिलाचे उत्पन्न मिळते. मात्र सुधारित नळपाणी पुरवठा योजनेकडे महापालिकेचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. १७ वर्षांपूर्वी मिरज नगरपालिका असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत मिरज शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेला कर्जाऊ निधी मिळण्यासाठी योजनेचा आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे नळपाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली नसल्याने ४५ कोटींचा खर्च आता ७० कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. सुधारित नळपाणीपुरवठा रखडल्याने तीन कोटी खर्चाची कृष्णाघाट ते मिरज मुख्य जलवाहिनी, अडीच कोटी खर्च करून जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली. भारतनगर, किल्ला भाग, इंदिरानगर, मगदूम मळा येथे पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. समतानगर, वखार भाग, कुपवाड रोड येथे नवीन पाण्याच्या टाक्यांची आवश्यकता असल्याने याठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. २०३७ पर्यंत मिरजेची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सुधारित नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. मात्र केंद्राकडून योजना मंजूर झाली नसल्याने राज्याच्या सुजल योजनेतून नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुजल योजनेतून सुधारित नळ पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने केवळ दहा टक्के तरतूद केल्यास उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून व कर्ज मिळते; मात्र केंद्र व राज्य शासनाने योजनेसाठी अर्थसहाय्य दिले नसल्याने मिरजेची नळ पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मिरजेच्या नेत्यांचे दुर्लक्षसांगली शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली; मात्र मिरजेची योजना रखडली आहे. महाआघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील महापालिकेचे नेतृत्व करीत असताना व महापालिकेत काँग्रेस सत्तेवर आल्यानंतरही केंद्र व राज्य शासनाकडे मिरजेच्या नळपाणी योजनेबाबत पाठपुरावा झाला नाही. भाजपचे शासन असताना मिरजेचे लोकप्रतिनिधी या योजनेसाठी प्रयत्न करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. जुन्या पाईपलाईनला गळतीमिरज शहर व विस्तारित भागात सुमारे ३५० किलो मीटर लांबीच्या मोठ्या व छोट्या जलवाहिन्या आहेत. जुन्या जलवाहिन्या जिर्ण व अपुऱ्या असल्याने वारंवार गळती होऊन सांडपाणी मिसळते. यामुळे शहरातील अनेक भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत. जुन्या जलवाहिन्या बदलण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरीअभावी जुनी पाणी पुरवठा यंत्रणा अद्याप वापरात आहे. शहराच्या विस्तारित भागात समतानगर ते कोल्हापूर रस्त्यापर्यंत अद्याप जलवाहिनी नसल्याने येथील नागरिक कूपनलिकेवर अवलंबून आहेत.