इस्लामपूर : सकाळचे दहा वाजून गेले तरी, बस स्थानकावरील सफाई कामगार कचऱ्याचा धुरळा उडवत होते. त्यामुळे इस्लामपूर बसस्थानक आहे की कचरा डेपो, असाच प्रश्न उभा राहतो आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सफाई कामगार पगाराविना उपाशी आहेत, पण ठेकेदार मात्र तुपाशी आहे.इस्लामपूर बसस्थानक कार्यालय आणि परिसर ठेका पध्दतीने स्वच्छ करून घेतला जातो. शुक्रवार दि. १० रोजी सकाळी दहाच्या सुमारास दोन सफाई कामगार बस स्थानकातील प्रवासी थांबा व बसण्याचा परिसर स्वच्छ करीत होते. त्याची दुर्गंधी आणि धुरळा प्रवाशांच्या अंगावर उडत होता. त्यावेळी स्थानक प्रमुख यांचेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले.यापूर्वी दूषित पाण्यामुळे वाहक, चालकांना काविळीच्या साथीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात आला. परंतु पाण्याच्या टाक्या नियमितपणे स्वच्छ केल्या जात नाहीत. वाहक- चालकांच्या गेस्ट हाऊसवरील टाकीतील पाणी दूषित झाल्याचे सांगितले जात आहे.हे बसस्थानक राज्यातील एक आदर्श मॉडेल म्हणून परिचित होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. पण नियोजनाअभावी काही वृक्ष नष्ट होत आहेत. त्यामुळे या परिसरातील हवामानही दूषित झाले आहे. त्यातच ठेकेदाराकडून वेळेवर स्वच्छता केली जात नाही. याबाबत सफाई कामगारांनी स्पष्ट केले आहे की, आमचा पगार नाही, उपाशीपोटी आम्ही काम कसे करणार? यावरूनच कामगार उपाशी अन् ठेकेदार तुपाशी असल्यानेच, बस स्थानकाचा कचरा डेपो झाला आहे.
इस्लामपूर बसस्थानक की कचरा डेपो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 5:26 PM
सकाळचे दहा वाजून गेले तरी, बस स्थानकावरील सफाई कामगार कचऱ्याचा धुरळा उडवत होते. त्यामुळे इस्लामपूर बसस्थानक आहे की कचरा डेपो, असाच प्रश्न उभा राहतो आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सफाई कामगार पगाराविना उपाशी आहेत, पण ठेकेदार मात्र तुपाशी आहे.
ठळक मुद्देइस्लामपूर बसस्थानक की कचरा डेपोसफाई कामगार पगाराविना उपाशी, पण ठेकेदार मात्र तुपाशी