शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

इस्लामपूर, शिराळ्यात आनंदोत्सव !

By admin | Published: July 05, 2015 1:18 AM

यूपीएससी परीक्षा : सुमित गरुड, प्रवीण नलवडे यांचे चमकदार यश

इस्लामपूर/शिराळा : इस्लामपुरातील सुमित सुनील गरुड आणि शिराळ्यातील प्रवीण सुरेश नलवडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगली जिल्ह्याचा झेंडा फडकावला. सुमित गरुडने नागरी सेवा परीक्षेत देशात १६९ वा क्रमांक, तर प्रवीण नलवडे याने देशात ६४९ वा क्रमांक मिळवला. सुमितची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली आहे. इस्लामपूरच्या महादेवनगर परिसरातील सुमित शहरातून देशपातळीवरील परीक्षेत यश मिळविणारा पहिला विद्यार्थी ठरला. येथील आदर्श बालक मंदिरमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेताना त्याने चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सातवी शिष्यवृत्तीतही तो राज्यात सहावा आला. दहावीच्या परीक्षेत ९५.०६ टक्के गुण मिळवत कोल्हापूर विभागात २००३ मध्ये पहिला येण्याचा बहुमान त्याने पटकावला. २००५ ला बारावीच्या परीक्षेत विभागात सहावा आला. त्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून घेतले. मुंबई (परेल) येथील जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी मिळवितानाच त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी चालविली होती. त्यासाठी त्याने दिल्ली येथील स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यास सुरू केला. लागोपाठच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने देशात १६९ वा क्रमांक पटकावला. सुमित सध्या नागपूर येथील वनावती शासकीय प्रशिक्षण केंद्रात सहायक गटविकास अधिकारी पदाचे प्रशिक्षण घेत आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्याची निवड झाली होती. पाटबंधारे विभागातील अभियंता सुनील गरुड यांचा तो मुलगा आहे. त्याचा भाऊ संकेत हैदराबाद येथे भारतीय पेट्रोलियम कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. (वार्ताहर) कापसाच्या निकृ ष्ट बियाण्यांचा २० कोटींचा फटका बियाणे अनुवंशकीय अशुध्द : शेतकऱ्यांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचा राहुरी कृषी विद्यापीठाचा अहवाल अविनाश बाड ल्ल आटपाडी आटपाडी तालुक्यात यंदा उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेले कृषीधन सीडस् प्रा. लि. जालना या बियाणे उत्पादक कंपनीचे सुपर फायबर बी. जी. (के.डी.सी.जी.बी) ४०७ या वाणाचे बियाणे अनुवंशकीय अशुध्द असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अधीर आहेर आणि डॉ. नीलेश पवार यांनी दिला आहे. कंपनीने तालुक्यातील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरावरून २० कोटी फटक्याचा नांगर फिरविला आहे. यंदा लागवड केलेल्या दोन कंपन्यांच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. कृषीधन कंपनीच्या बियाण्यांची तालुक्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी लागवड केली. त्याच कंपनीचे बियाणे बोगस असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर ग्रीन गोल्ड सीडस् प्रा. लि., औरंगाबाद या कंपनीचे कविता गोल्ड बी. जी. ११ या वाणाच्या कापसामध्ये ४० टक्के आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव शास्त्रज्ञांना आढळून आला आहे. त्यामुळे या कापूस पिकामध्ये ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कृषी शास्त्रज्ञांच्या अहवालामुळे आता आटपाडी तालुक्यात उन्हाळ्यात यंदा तापमानात वाढ झाल्यामुळे कापसाचे नुकसान झाल्याचा कंपनी आणि विक्रेत्यांचा दावा खोटा ठरला आहे. शेतकऱ्यांनी कापसासाठी केलेली सगळी मेहनत वाया गेली आहे. आटपाडी तालुका तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष आणि उपविभागीय कृषी अधिकारी जे. जी. कवडे यांनी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांना कृषी शास्त्रज्ञांच्या अहवालासह आतापर्यंत उपलब्ध झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचा अहवाल सादर केला आहे. पुण्याच्या कृषी आयुक्तालयाचे संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण), कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक आणि सांगलीचे कृषी जिल्हा अधीक्षक यांनाही त्यांनी अहवाल सादर केला आहे. शेतकऱ्यांनी तक्रारी द्याव्यात शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यांबाबत तक्रारी केल्यापासून कृषी विभागाने वारंवार कारवाईस विलंब लावल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. आता शास्त्रज्ञांचा अहवाल प्राप्त होताच आजच (जा.क्र. ३ वि कृ अ/ तंत्र-१ / कापूस तक्रार/१८३९/२०१५) तातडीने वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. पण काही गावपातळीवरील कर्मचारी शेतकऱ्यांना काही मिळणार नाही, असे सांगत आहेत. ग्राहक न्यायालयाने २००८ च्या बोगस कापूस बियाण्यांबाबत नुकसानभरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी ५१ हजार रुपये देण्याचा कंपनीला आदेश दिला आहे. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे तक्रार देण्याची गरज आहे.