शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Sangli: एसटी बस उशिरा आली, अधिकाऱ्यांशी वादावादी घालत प्रवाशाकडून तिकीटास नकार; गुन्हा दाखल

By शीतल पाटील | Published: November 21, 2023 7:00 PM

शिराळा : शिराळा आगाराची इस्लामपूर-ढाणकेवाडी एसटी बस इस्लामपूर येथील प्लॅटफॉर्मवर लागली. प्रवाशीही बसले. मात्र एक प्रवाशाने या बसला दहा ...

शिराळा : शिराळा आगाराची इस्लामपूर-ढाणकेवाडी एसटी बस इस्लामपूर येथील प्लॅटफॉर्मवर लागली. प्रवाशीही बसले. मात्र एक प्रवाशाने या बसला दहा मिनिटे उशीर का झाला, मी तिकीट काढणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर या प्रवाश्याविरोधात एसटीच्या अधिकाऱ्यांनी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.ही बस ( क्रमांक एम एच ०६ एस ८२०२) इस्लामपूर हुन ढाणकेवाडी ला जाणार होती. सध्या पुणे मुंबई मार्गावर जादा प्रवाशी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे काही गाड्या उशिरा सुटत आहेत. सायंकाळी सव्वा सातची ही बस साडेसातच्या दरम्यान सुटली. या बसमधील एका प्रवाशाने बसला का उशीर झाला, मी तिकीट काढणार नाही, असा पवित्रा घेतला. वाहक, चालकांनी समजावून सांगितले. यानंतर बस चेकर आले त्यांनीही प्रवाश्यांची तिकीट तपासणी करताना त्यांनाही समजावले. मात्र त्यांनाही दाद दिली नाही.अखेर ही बसरात्री आठ वाजता शिराळा पोलीस ठाण्यात आणली. यावेळी पोलिसांनीही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशाने अजिबात दाद दिली नाही. इतर प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची सोय करण्याची वेळ महामंडळावर आली. दुसरी बस आल्यावर हा प्रवाशीही झटकन त्यात बसला. रात्री सव्वा नऊ वाजता दुसरी बस प्रवाशी घेऊन रवाना झाली. यानंतर आगार प्रमुख संजय चव्हाण यांनी या प्रवाश्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. दरम्यान संबंधित प्रवाशी सतत वाहक- चालकांना त्रास देत असतो, अशीही चर्चा बसस्थानकात होती.

टॅग्स :Sangliसांगली