अशोक पाटीलइस्लामपूर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली १६ वर्षे कार्यरत असलेले शहरप्रमुख, माजी नगरसेवक शकील सय्यद यांनी पवार यांच्यापासून फारकत घेतली आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहण्याची भूमिका स्वीकारली आहे.माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत खराडे व उपजिल्हाप्रमुख दि. बा. पाटील यांच्या बोटाला धरून शकील सय्यद शिवसेनेत आले. त्यानंतर खराडे यांच्या नेतृत्वाखाली पवार यांची एन्ट्री झाली. इस्लामपूरात मागील पालिका निवडणुकीत शिवसेनेचे पाच नगरसेवक होते. त्यामध्ये सय्यद यांचाही समावेश होता.
शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पवार यांनी प्रवेश केला. परंतु, सय्यद यांनी भूमिका स्पष्ट केली नव्हती. खासदार संजय राऊत यांच्या सांगली येथील कार्यक्रमात सय्यद यांनी उपस्थिती लावून भावना व्यक्त केल्या. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.नामांतराच्या मागणीमुळे दुरावाआनंदराव पवार यांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करण्यासाठी आंदोलने, सह्यांची मोहीम सुरू केली होती. पालिकेत ठरावही आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच सय्यद दुरावले असावेत, अशी चर्चा होती.