इस्लामपूर : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांना धडा शिकवू, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील (साखराळेकर) व राहुल महाडिक यांनी दिला. तसेच सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.बाजार समिती संचालक मंडळाच्या १९ जागांसाठीच्या निवडणुकीत प्रथमच सत्ताधारी राष्ट्रवादीसमोर एकास एक लढतीचे आव्हान उभे केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील व महाडिक बोलत होते. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.पाटील म्हणाले, तालुक्यातील सर्वांनीच एकत्र येऊन सर्वसमावेशक पॅनेल करुन कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळून चांगला दर मिळावा, या हेतूने बाजार समितीची स्थापना झाली. मात्र येथे शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. सत्ताधाऱ्यांनी जनावरांचा बाजार बंद पाडला. त्या जागेवर बंगले उभे राहिले. सेस न भरता परस्पर मालाची विक्री झाल्याने उत्पन्न बुडाले. मोजक्याच व्यापाऱ्यांशी हितसंबंध ठेवून कारभार सुरु आहे. ते म्हणाले, बाजार समित्यांसाठी शासनाच्या अनेक शेतकरीहिताच्या योजना आहेत. त्यांची अंमलबजावणी नाही. बाजार समितीला राजकीय अड्डा बनविले आहे. निवडणूक जिंकण्याच्या ईर्षेने उतरलो आहोत. यावेळी जयकर कदम, शकील सय्यद, नंदकुमार निळकंठ, सागर मलगुंडे, मकरंद करळे, महेश पाटील, शैलेश सूर्यवंशी उपस्थित होते. (वार्ताहर)राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कातराहुल महाडिक म्हणाले, बाजार समितीची निवडणूक ताकदीने लढणार आहोत. सत्ता आल्यानंतर बाजार समितीची चौकशी करणार आहोत. राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे चमत्कार घडवू.विजय पवार म्हणाले, बाजार समितीचा कारभार चालविण्यासाठी ताकारी बाजार आवारातील १६ गुंठे जागा विकायला काढली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.अभिजित पाटील म्हणाले, स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेचा वापर सुरु आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी आताच आवाज उठविण्याची गरज आहे
इस्लामपूर बाजार समितीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू
By admin | Published: July 16, 2015 11:27 PM