इस्लामपूर : राजारामबापू कारखान्याच्या निवडणुकीत गुरुवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजअखेर एकूण ४९ अर्ज दाखल झाले आहेत. कुंडल गटातील एकमेव अर्ज वगळता उर्वरित सर्व अर्ज जयंत पाटील समर्थकांचे आहेत. आठ विद्यमान संचालकांना अर्धचंद्र मिळाला आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.येथील सहायक निबंधक कार्यालयात गुरुवारी अखेरच्या दिवशी रणजित खवरे (मालेवाडी), रणजित पाटील (कामेरी), युवराज पाटील, बाळूकाका पाटील (इस्लामपूर), भाऊसाहेब कदम (बोरगाव गट), रघुनाथ जाधव, बबन थोटे, रामचंद्र सिद्ध, आप्पासाहेब हाक्के, वैभव साळुंखे-पाटील (आष्टा गट), दीपक पाटील, प्रमोद गायकवाड, सर्जेराव भगत, सुरेश पाटील (कुरळप गट), जयंत पाटील, प्रतीक पाटील, देवराज पाटील, अजित पाटील, सतीश पाटील (पेठ गट), प्रकाश पवार, राजेंद्र पाटील (कुंडल गट) यांचे अर्ज आले, तर अशोक जाधव यांचा कुंडल गटातील एकमेव अर्ज विरोधातील आहे.देवराज पाटील यांनी संस्था गटातूनही अर्ज भरला आहे. जालिंदर कांबळे, योजना सचिन शिंदे, उत्तम माळी, हणमंत माळी (इतर मागास प्रवर्ग) यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व ४९ अर्जांची छाननी दि. २० रोजी शुक्रवारी होईल. त्यानंतर ६ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.यांना मिळाला अर्धचंद्रकारखान्याच्या स्थापनेपासून ५३ वर्षे संचालकपद आणि २८ वर्षे अध्यक्षपद भूषविणारे पी. आर. पाटील (कुरळप), विराज शिंदे (आष्टा), दिलीपराव पाटील (येलूर), श्रेणिक कबाडे (कारंदवाडी), एल. बी. माळी (बागणी), भगवान पाटील (इस्लामपूर), प्रदीप थोरात (नरसिंहपूर), महिला संचालिका सुवर्णा पाटील (बहे) यांना यावेळच्या निवडणुकीत अर्धचंद्र मिळाला आहे.उमेदवारी अर्ज दाखल केलेले विद्यमान संचालकआमदार जयंत पाटील (कासेगाव), विजयराव पाटील (साखराळे), देवराज पाटील (कासेगाव), कार्तिक पाटील (बोरगाव), प्रकाशराव पवार (कुंडल), प्रदीपकुमार पाटील (शिगाव), विठ्ठल पाटील (बहे), माणिक शेळके (आष्टा), मेघा पाटील (शिगाव), जालिंदर कांबळे (इस्लामपूर).
राजारामबापू कारखान्याची निवडणूक बिनविरोधकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 5:53 PM