वाळवा : महिलांनी आजच्या काळामध्ये सक्षम व्हावे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन हुतात्मा बझारच्या कार्यवाह नंदिनी वैभव नायकवडी यांनी केले.
वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर वायदंडे उपस्थित होते. सुरुवातीला क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी व कुसुमताई नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नंदिनी नायकवडी म्हणाल्या, आजच्या युगातील स्त्री अनेक भूमिका पार पाडत आहेत. मुलींनी आपले जीवन जगत असताना अतिशय खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे. प्राचार्य मधुकर वायदंडे यांनीही मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले, स्त्रियांनी स्वत:ला कधीही कमी लेखू नये. अधिकारासाठी संघर्षाची तयारी असावी. रेश्मा सदामते यांनी स्वागत केले. रेश्मा वलांडकर यांनी सूत्रसंचालन केले.