सांगली : कोरोना यंदा आयटीआय शिक्षणक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला तीन ते चार महिने विलंब झाला असला तरी सर्व जागा शंभर टक्के भरण्याचा प्रशासनाला विश्वास आहे. सध्या तिसरी फेरी सुरु आहे. चौथ्या फेरीअखेर विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता शासकीय आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर यांनी व्यक्त केली.
सप्टेंबरमध्ये पहिली फेरी झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयामुळे प्रक्रिया थंडावली. आता पुन्हा प्रक्रिया सुरु करण्याच्या आदेशानंतर ५ ते ८ डिसेंबरदरम्यान दुसरी फेरी झाली. १२ डिसेंबरला तिसरी फेरी संपली. आजअखेर ५० टक्के म्हणजे ४५० जागांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. १९ ते २२ डिसेंबरदरम्यान चौथी व अंतिम फेरी होईल. ३० व ३१ डिसेंबरला समुपदेश फेऱ्या होतील.
पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग एव्हाना सुरु झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन वर्ग भरविले जात आहेत. वर्गात अद्याप पुरेशी उपस्थिती नसणे कोरोनामुळे पथ्यावर पडले आहे. यंदा दहावीचा निकाल चांगला लागल्याने पहिल्या फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांशी फोनवर संपर्क करुन बोलविले जात आहे. लॉकडाऊन व मराठा आरक्षण यामध्ये एकूणच शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले, त्याचा त्रास प्रशासन आणि विद्यार्थी या दोहोंना सोसावा लागत आहे. परीक्षेपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान व्यवस्थापनापुढे असेल. व्हाना विविध ट्रेडच्या ५० टक्के जागा भरल्या आहेत. जिल्ह्याची क्षमता १०५० जागांची आहे, पैकी ४५० प्रवेश निश्चित झाल्याचे प्राचार्य यतीन पारगावकर म्हणाले. सप्टेंबरमध्ये पहिल्या फेरीत अपेक्षित ट्रेड घेतलेले अनेकजण नंतर प्रवेश रद्द करतात, त्या जागा तिसऱ्या व चौथ्या फेरीत पुढील विद्यार्थ्यांना मिळतात, त्यामुळे शेवटच्या फेरीअखेर शंभर टक्के जागा भरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.व्हाना विविध ट्रेडच्या ५० टक्के जागा भरल्या आहेत. जिल्ह्याची क्षमता १०५० जागांची आहे, पैकी ४५० प्रवेश निश्चित झाल्याचे प्राचार्य यतीन पारगावकर म्हणाले. सप्टेंबरमध्ये पहिल्या फेरीत अपेक्षित ट्रेड घेतलेले अनेकजण नंतर प्रवेश रद्द करतात, त्या जागा तिसऱ्या व चौथ्या फेरीत पुढील विद्यार्थ्यांना मिळतात, त्यामुळे शेवटच्या फेरीअखेर शंभर टक्के जागा भरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.व्हाना विविध ट्रेडच्या ५० टक्के जागा भरल्या आहेत. जिल्ह्याची क्षमता १०५० जागांची आहे, पैकी ४५० प्रवेश निश्चित झाल्याचे प्राचार्य यतीन पारगावकर म्हणाले. सप्टेंबरमध्ये पहिल्या फेरीत अपेक्षित ट्रेड मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, फिटर, टर्नर या ट्रेडचे विद्यार्थ्यांचे आकर्षण अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याखालोखाल वातानुकुलन, रेफ्रिजरेशन, ड्राफ्टसमन याकडे कल आहे. दोन वर्षांच्या शिक्षणक्रमापेक्षा वर्षभराच्या ट्रेडना पसंती आहेमेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, फिटर, टर्नर या ट्रेडचे विद्यार्थ्यांचे आकर्षण अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याखालोखाल वातानुकुलन, रेफ्रिजरेशन, ड्राफ्टसमन याकडे कल आहे. दोन वर्षांच्या शिक्षणक्रमापेक्षा वर्षभराच्या ट्रेडना पसंती आहेमेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, फिटर, टर्नर या ट्रेडचे विद्यार्थ्यांचे आकर्षण अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याखालोखाल वातानुकुलन, रेफ्रिजरेशन, ड्राफ्टसमन याकडे कल आहे. दोन वर्षांच्या शिक्षणक्रमापेक्षा वर्षभराच्या ट्रेडना पसंती आहे
------------