शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जाडरबोबलादमध्ये भाजप-कॉँग्रेसमध्येच सामना

By admin | Published: January 15, 2017 11:36 PM

खुला मतदारसंघ; इच्छुक वाढले : उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी निश्चित, जोरदार रस्सीखेच

मच्छिंद्र बाबर ल्ल माडग्याळजाडरबोबलाद (ता. जत) येथील जिल्हा परिषद गट यावेळी खुला झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. जाडरबोबलाद गण व माडग्याळ गणात राजकीय पक्षांना उमेदवार शोधण्याची वेळ आल्याचे सध्याचे चित्र आहे. या मतदार संघात भाजप विरुध्द कॉँग्रेस अशी लढत असली तरी, पक्षाकडून उमेदवार न मिळाल्यास बंडखोरी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यताही आहे.या मतदारसंघात जि. प. साठी सध्या आठजण आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी रस्सीखेच आहे. त्यामध्ये भाजपच्यावतीने माजी जि. प. सदस्य बसवराज बिरादार, माजी. पं. स. सदस्य सोमण्णा हक्के, बाजार समितीचे संचालक विठ्ठल निकम, जाडरबोबलादचे विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष तम्मणगौंडा रवी-पाटील, गुड्डापूरचे माजी सरपंच अशोक पुजारी, तर कॉँग्रेसच्यावतीने बाजार समिती संचालक संतोषगौडा पाटील, जत साखर कारखान्याचे माजी संचालक सदाशिव माळी, उटगीचे सरपंच भीमराव बिरादार आदी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपतर्फे बसवराज बिरादार आणि कॉँग्रेसतर्फे सदाशिव माळी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून, इतर दोन्ही पक्षातील इच्छुक पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या मागे खंबीरपणे राहणार असल्याचे बोलत असले तरी, नाराज गट बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जाडरबोबलाद पंचायत समिती गण मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असून, या गणामध्ये उटगी, सोन्याळ, जाडरबोबलाद, लकडेवाडी, लमाणतांडा आदी गावांचा समावेश असून, या गणात सुशिक्षित महिला उमेदवार मिळविण्यासाठी कॉँग्रेस व भाजपला चाचपणी करावी लागणार आहे. कॉँग्रेसतर्फे सोन्याळच्या महादेवी कांबळे, उटगीच्या सुनंदा सन्नोळी यांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे. भाजपच्यावतीने पुन्हा विद्यमान जि. प. सदस्या सौ. सुशिला होनमोरे यांनाच मैदानात उतरविण्याची तयारी कार्यकर्ते करीत आहेत.माडग्याळ पंचायत समिती गण मागासवर्गीय पुरुषांसाठी राखीव झाला असून, या गणात माडग्याळ, कुलाळवाडी, गड्डापूर, व्हसपेठ, अंकलगी आदी गावांचा समावेश आहे. या गणात सध्या कॉँग्रेसतर्फे माडग्याळचे सरपंच सुरेश ऐवळे, व्हसपेठचे गोपाल सर्जे यांच्या नावांची चर्चा आहे, तर भाजपच्यावतीने अशोक हुवाळे, तम्मा चव्हाण हे इच्छुक आहेत. जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटात आगामी जि. प. निवडणुकीसाठी भाजप व कॉँग्रेस पक्षात जोरदार चुरस निर्माण होण्याची शक्यता असून, उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वचजण कामाला लागले आहेत. प्रत्येक इच्छुक तालुका आणि जिल्ह्यातील नेत्यांकडे संपर्क ठेवून आहेत. पंचायत समिती गणासाठी निवडणूक जास्त महत्त्वाची नसून, जिल्हा परिषद गटात मात्र मोठी चुरस आहे.या मतदार संघात लिंगायत समाजाची संख्या मोठी आहे. त्याखालोखाल धनगर समाज आहे. ज्या समाजाची मते जास्त आहेत, त्या समाजाचा उमेदवार देण्यावर राजकीय पक्षांचा भर राहील. तसे झाल्यास धनगर समाज इतर सर्व समाज एकत्र करुन स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची दाट शक्यता आहे.जाडरबोबलाद जि. प. गट खुला आहे. या गटात खुल्या वर्गातील उमेदवारांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी माडग्याळ पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी जि. प. सदस्य कृष्णदेव गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करुन, खुल्या जागेवर खुल्या वर्गातील उमेदवारांनाच संधी द्या व आरक्षण असलेल्या ठिकाणी आरक्षितांना संधी द्या, खुल्या वर्गावर इतर उमेदवार लादू नका, असे त्यांचे म्हणणे आहे. जसे मागासवर्गीय व इतर आरक्षित जागेसाठी खुला उमेदवार चालत नाही, तसे खुल्या गटावरही इतर उमेदवारांना उभे राहण्यास संधी नाकारावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खुल्या वर्गावर होणारा अन्याय सहन करणार नसल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे स्थान या मतदार संघात मात्र सद्यातरी नगण्य आहे.