लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : श्री अतिशय क्षेत्र धर्मगिरी बांबवडे, वाटेगाव, टाकवे (ता. शिराळा) येथे बुधवार, दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता ऐतिहासिक जैनेश्वरी दीक्षा समारोह कार्यक्रम होणार असल्याची माहिती आचार्य सन्मती वर्धमान चातुर्मास समितीने दिली.
सुकुमार दणाणे, सावळवाडी (महाराष्ट्र,), अभिनंदन जैन, नोएडा (दिल्ली), उत्तमचंद जैन, बंडा-सागर (मध्यप्रदेश) या तीन दीक्षार्थींना आचार्य प.पू. १०८ वर्धमानसागर महाराज दीक्षा देणार आहेत. यावेळी प.पू. १०८ धर्मसागर महाराज, प.पू. १०८ गुणसागरजी महाराज, प.पू. १०८ शिवसागरजी महाराज उपस्थित राहणार आहेत. सकाळी सात वाजता दीक्षार्थींचे मंगलस्नान होणार आहे. आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे. नऊ वाजता सन्मती संस्कार मंच व वीर सेवा दल यांच्यावतीने धर्मगिरी डोंगरावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यावेळी सन्मती संस्कार मंचचे प्रमुख सुरेश चौगुले, संघटक सुनील पाटील उपस्थित राहणार आहेत. ११ वाजता मार्गदर्शन होणार आहे. दोन वाजता प्रमुख दीक्षा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची सांगता आचार्य वर्धमानसागर महाराजांसह मुनींच्या प्रवचनाने होणार आहे. हे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवूनच होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. जैनेश्वरी दीक्षा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी वाटेगाव, बांबवडे, टाकवे येथील जैन श्रावक-श्राविका व तीर्थक्षेत्र कमिटीचे कार्यकर्ते राबत आहेत.