शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सांगली लोकसभेची जागा जनता दल (सेक्युलर) लढविणार, पक्षीय बैठकीत निर्णय 

By अविनाश कोळी | Published: March 13, 2024 11:41 AM

सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा जनता दलामार्फत (सेक्युलर) पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये घेण्यात आला. आगामी लोकसभा ...

सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा जनता दलामार्फत (सेक्युलर) पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये घेण्यात आला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड येथे जनता दलाच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये जनता दलाचे दिवंगत माजी प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्या विचाराने पुढील राजकारणाची दिशा ठेऊन आगामी सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रदेश जनता दलाचे सचिव प्रेमचंद पांड्याजी, महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष डॉ. जयपाल चौगुले पश्चिम महाराष्ट्र युवा जनता दल प्रमुख अॅड. फैय्याज झारी, महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष सुमित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड, जिल्हा सचिव जनार्धन गोंधळी, माजी नगरसेवक बाळासाहेब बोरगावे, शफीक बुऱ्हाण, मिरज तालुका प्रमुख संजय ऐनापुरे, कवठे महांकाळ प्रमुख प्रमोद ढेरे, उपाध्यक्ष साहेबउद्दीन मुजावर, प्रा. सलीम सय्यद, डॉ. प्रा. लक्ष्मण शिंदे यांनी संघटन बांधणी मजबुत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी लोकसभा ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त करून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन पांड्याजी यांनी केले. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा