शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

शिवाजीराव देशमुख यांना जनसागराचा साश्रू निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:06 AM

शिराळा/ कोकरूड/ बिळाशी : अढळ पक्षनिष्ठा, स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ...

शिराळा/ कोकरूड/ बिळाशी : अढळ पक्षनिष्ठा, स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार शिवाजीराव देशमुख यांच्यावर कोकरूड येथे शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी राज्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.कोकरूड येथील हिराई निवासात शिवाजीराव देशमुख यांचे पार्थिव दुपारी दीड वाजता आणण्यात आले. याठिकाणी धार्मिक विधी करून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. याठिकाणी महिला, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी सरोजिनीदेवी देशमुख, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार संजय दत्त, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, रेणुकादेवी देशमुख, फत्तेसिंगराव देशमुख, डॉ. पृथ्वीराज पाटील, संपतराव देशमुख, रामराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी विजयकुमार कळम-पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार शीतलकुमार यादव, तामिळनाडू राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आनंदराव पाटील, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, मनोज शिंदे-म्हैसाळकर, पी. आर. पाटील, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, शरद पाटील, शैलजाभाभी पाटील, विशाल पाटील, बाळासाहेब पाटील, सुरेशराव चव्हाण, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, उदयसिंगराव नाईक, आमदार त्र्यंबक भिसे, दिनकरराव पाटील, भगवानराव साळुंखे, पृथ्वीराज पाटील, सुरेश पाटील, सत्यजित तांबे, सुमनताई पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे उपस्थित होते.