जत नगरपालिका त्रिशंकू, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:28 PM2017-12-11T16:28:08+5:302017-12-11T16:35:25+5:30

जत नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मतदारांनी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस व मित्रपक्ष सात, भाजप सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शुभांगी अशोक बन्नेनवार यांनी ७२१९ मते घेऊन भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभव केला.

Jat Nagarpalika Trishanku, Congress's Shubhangi Bannenwar won the post of city president | जत नगरपालिका त्रिशंकू, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवार विजयी

जत नगरपालिका त्रिशंकू, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवार विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देजत नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीचीकाँग्रेस ७, भाजप ७, राष्ट्रवादीला ६ जागाभविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम

सांगली : जत नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मतदारांनी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस व मित्रपक्ष सात, भाजप सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शुभांगी अशोक बन्नेनवार यांनी ७२१९ मते घेऊन भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभव केला.


जत नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. भाजपचे आमदार विलासराव जगताप, जतचे काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

या निवडणुकीकडे भविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. लोकनियुक्त नगराध्यक्षपदामुळे भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकीय शक्ती पणाला लावली होती.

रविवारी सर्वत्र सरासरी ७५.५५ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी बन्नेनवार आणि भाजपच्या डॉ. रेणुका आरळी यांच्यात चुरस निर्माण झाली होती.

शुभांगी बन्नेनवार यांनी तिसऱ्या फेरीपासून आघाडी घेत ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. शेवटच्या फेरीमध्ये त्यांनी भाजपच्या डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभव करून विजय खेचून आणला. रेणुका आरळी यांना ७०४१, राष्ट्रवादीच्या शबाना इनामदार यांना ३८६१, शिवसेनेच्या शांताबाई राठोड यांना २४६ मते मिळाली.


जत नगरपालिकेतील एकूण २० जागांसाठी मतदान झाले होते. यापैकी काँग्रेसने मित्र पक्षासह सात जागांवर विजय मिळविला. पण, बहुमताची संख्या त्यांना गाठता आली नाही. तरीही नगराध्यक्षांसह आठ जागांवर विजय मिळविल्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाक्याची आताषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

काँग्रेसचे विजयी उमेदवार आणि कंसात त्यांना पडलेली मते.
संतोष कोळी (१०५८), गायत्रीदेवी शिंदे (७०१), अश्विनी माळी (९९५), इकबाल गवंडी (१०५३), नामदेव काळे (१०८८), कोमल शिंदे (७३०) या सहा जागांबरोबरच त्यांचा मित्र पक्ष असलेल्या बसपला एक जागा मिळाली आहे. संतोष कांबळे (११६६) यांनी विजय मिळवून बसपचे जतमध्ये खाते उघडले आहे.

भाजपच्या नेत्यांनी जत नगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी खूप प्रयत्न केले. मंत्र्यांच्या सभांसह जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्याही सभा झाल्या होत्या. तरीही नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांना १२८ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
 

भाजपचे सात नगरसेवक विजयी झाले. यामध्ये प्रमोद हिरवे (६३३), दीप्ती सावंत (९७२), श्रीदेवी सगरे (१०३३), जयश्री शिंदे (८८६), विजय ताड (८६८), प्रकाश माने (३९९), जयश्री मोटे (७८०) यांचा समावेश आहे. भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे आमदार विलासराव जगताप यांनाही मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार- वनिता साळे (८७१), आप्पासाहेब पवार (९५२), बाळाबाई मळगे (५८८), स्वप्नील शिंदे (६४७), भारती जाधव (८७६), लक्ष्मण एडके (९२१) यांचा समावेश आहे. या निकालाने जत शहरावरील सुरेश शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचला आह.
 

Web Title: Jat Nagarpalika Trishanku, Congress's Shubhangi Bannenwar won the post of city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.