शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जत तालुक्यामध्ये तुरीची वाढ खुंटली : शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:19 PM

परतीच्या पावसाने दिलेली दडी, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील तूर पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. शेंगा कमी लागल्या आहेत. शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. कर्नाटकात ५९५० रुपये क्विंटल दराने सरकार तूर खरेदी करते.

गजानन पाटील ।संख : परतीच्या पावसाने दिलेली दडी, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील तूर पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. शेंगा कमी लागल्या आहेत. शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादन कमी होणार आहे. उत्पादनात ८० टक्क्याने घट होणार आहे.

तालुक्यातील उटगी येथील शेतकऱ्यांना दोन एकरात ३० किलो तुरीचे उत्पादन मिळाले. ज्या प्रमाणात खर्च केला, त्या प्रमाणात उत्पादन न मिळाल्याने निराश होऊन शेतकºयाने आत्महत्या केली. त्यामुळे तुरीच्या उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तालुक्यात कडधान्य म्हणून तूर पीक घेतले जाते. कमी खर्चात, कमी पावसावर, कमी भांडवलात व माळरानावर तूर पीक येत असल्याने शेतकºयांचा हे पीक घेण्याकडे गेल्या पाच वर्षापासून कल वाढला आहे. तूर, तीळ, करडई, भुईमूग, सोयाबीन, मटकी ही गळीत व कडधान्य पिके घेतात. यंदा पाऊस पडेल, या आशेवर ५ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्यात आली आहे. पण परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. पावसाअभावी प्रतिकूल हवामानामुळे फूलगळही झाली आहे. यामुळे तुरीच्या उत्पादनात ८० टक्के घट होणार आहे.

तालुक्यातील पहिल्या पावसावर शेतकºयांनी तुरीची पेरणी केली होती. हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल असे सांगितले होते. पण पाऊस कमी झाल्याने अपेक्षित वाढ झाली नाही.सरकार सवलत का देत नाही?तुरीची आधारभूत किंमत क्विंटलला ५४५० रुपये आहे. कर्नाटक सरकार शेतकºयांना क्विंटलला ५०० रुपये अनुदान देते, तर राज्य शासन तुरीला का अनुदान देत नाही. कर्नाटकात ५९५० रुपये क्विंटल दराने सरकार तूर खरेदी करते. गावातील सेवा सोसायटीला खरेदी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तर मग आमचे शासन शेतकºयांना सवलत का देत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तूर उत्पादक शेतकºयाची आत्महत्यातालुक्यात प्रथमच उटगी येथील लायाप्पा रायगोंडा इंचूरया शेतकºयाने तुरीचे उत्पादन कमी आल्याने आत्महत्या केली आहे. त्यांना दोन एकरातून २५ ते ३० किलो उत्पादन मिळाले.एकरी खर्चावर दृष्टिक्षेप...मशागत : २१०० रुपये, पेरणी : ५०० रुपयेबियाणे : ५०० रुपये, दोन वेळा कोळपणी : १००० रुपयेचार फवारण्या : १६०० रुपये, काढणी : २००० रुपये

तूर पेरणी क्षेत्र...गेल्यावर्षी झालेली पेरणी : ७ हजार १०० हेक्टरयावर्षी झालेली पेरणी : ५ हजार ३२ हेक्टर 

तीन एकर तूर पेरणी केली आहे. पाऊस नसल्याने अपेक्षित उत्पन्न नाही. सध्या तूर वाळू लागली आहे. काहीच उत्पादन मिळणार नसल्याने घातलेला खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. तुरीच्या उत्पादनातही घट येणार असल्यामुळे शेतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. शासनाने मदत करावी.- प्रशांत जामगोंड, तूर उत्पादक

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस