शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जत तालुक्यास कर्नाटकातून पाणी मिळणार

By admin | Published: April 11, 2017 12:25 AM

विलासराव जगताप : गुड्डापुरात पाणी टंचाई आढावा बैठक; ‘म्हैसाळ’ला निधी कमी पडू देणार नाही

जत : जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना कर्नाटकातून पाणी देण्यासंदर्भात कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात बोलणी झाली आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासन कर्नाटक शासनाला चार टीएमसी पाणी सोडणार आहे. त्याच्या मोबदल्यात जत तालुक्याला कर्नाटकातून पाणी मिळणार असल्याची माहिती आ. विलासराव जगताप यांनी दिली. गुड्डापूर (ता. जत) येथे आयोजित केलेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या अपूर्ण कामासंदर्भात येत्या चार-पाच दिवसात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. बिळूर व देवनाळ कालव्यासाठी निधी आला आहे. आता निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.ते म्हणाले की, तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना आता कालव्यातून येणारे पाणी मिळणार आहे. पूर्व भागात पाणी येण्यास आणखी कालावधी लागणार आहे. जत तालुका विस्ताराने मोठा आहे. तालुका विभाजनास आणखी वेळ लागणार आहे. तोपर्यंत पूर्व भागासाठी एक स्वतंत्र तहसीलदार दिला जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सध्या तालुक्यात बंद आहेत. परंतु परवानगी घेऊन यापुढे काम सुरू करता येणार आहे. यापूर्वी झालेल्या कामाचे बिल निघणार आहे. तालुक्यातील २३ पाणी पुरवठा योजनांची कामे अपूर्ण आहेत. त्यापैकी काही ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध आहे; परंतु काम अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. यासंदर्भात एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. तालुक्यात भयानक चारा व पाणी टंचाई जाणवत आहे. प्रतिटँकर तीन ते पाच हजार रुपये खर्च करुन टँकरद्वारे पाणी आणून फळबागांना दिले जात आहे. शासन कर्जमाफी करत नाही, त्यामुळे टँकरसाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी पं. स. माजी सदस्य बिळ्यानी बिराजदार यांनी केली. टंचाई आढावा बैठकीस गैरहजर असणारे ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करावा, याशिवाय गैरहजर सरपंच, उपसरपंच यांना उपस्थित राहण्याची सूचना करावी, असा आदेशही जगताप यांनी दिला. सुरुवातीस गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर वीज वितरण, टँकर, पाणीपुरवठा आदी विषयांवर चर्चा झाली. प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार अभिजित पाटील, पंचायत समिती सभापती मंगल जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, जि. प. सदस्य सरदार पाटील, एम. टी. मठपती, सी. आर. गोब्बी, मनोज जगताप, लक्ष्मी माळी, विष्णू चव्हाण, श्रीदेवी जावीर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)