जत : राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच पालकमंत्री जयंत पाटील यांना पाणीप्रश्न व जत शहराचा विकास करण्यासाठी आश्वासन दिले होते. त्यानुसार जतच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करून त्याला मंजुरी मिळवून देण्यासाठी मंत्री पाटील हे प्रयत्न करतील, असा विश्वास माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, शनिवारी माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. जत शहरातील पाणी योजनेची पाईपलाईन कालबाह्य झाली आहे. नवीन योजना व वाढत्या विस्तारीकरणात २०५० ची लोकसंख्या गृहीत धरून नवीन पाणी योजना राबविणे गरजेचे आहे. याची मंत्री जयंत पाटील यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. सध्याचे नगरसेवक काम करण्यात उदासीन आहेत. जत शहरात उद्याने नाहीत, नाना-नानी पार्क नाही, यासह अनेक समस्या आहेत. यामुळे येत्या वर्षभरात राष्ट्रवादी पक्षाकडून जत शहरातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करून घेऊ, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
120921\img-20210910-wa0056.jpg
इस्लामपूर पॅटर्नप्रमाणे जत शहराचा विकास आराखडा करणार: मोहन(भैय्या) कुलकर्णी