शरद जाधव -- सांगलीदुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचे ऐन हिवाळ्यातच उघडे पडणारे पात्र... दुष्काळी भागातील जनतेचा बारोमास पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष... प्रदूषणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने पाणी दूषित होण्याने चांगल्या पाण्याची होणारी गटारगंगा... ही सध्याच्या पाण्याची स्थिती, तर दुसरीकडे पाण्याचा वारेमाप वापर वाढल्याने क्षारपड जमिनीत होणारी वाढ आणि योजनेतून सोडण्यात येणारे हजारो लिटर पाणी वाया जाते, हे दोन्ही विरोधाभास आपणच निर्माण करीत असताना, पाणी म्हणजे एक मौल्यवान वस्तू म्हणून त्याकडे समाजाने पाहण्याची मानसिकता तयार करण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्यानेच ‘जलसप्ताहा’सारखे सोपस्कार पूर्ण करण्याची वेळ आल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
औपचारिकतेच्या कोरड्या पात्रात ‘जलजागृती’ची नौका
By admin | Published: March 16, 2016 8:28 AM