विकास शहा शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघाचे राजकीय पटलावर कायम वजन राहिले आहे. त्याचबरोबर अनेक मोठ्या घडामोडी घडून राज्याची सत्ता ही बदलण्यात येथील राजकीय ताकदीचा उपयोग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची कधी साथ कधी कडवा विरोध यास तोंड देत तीन अपयश पचवत अखेर त्यांचे साडू सत्यजित देशमुख यांनी विजय मिळवत आमदारकी मिळवली.यामुळे हे दोन साडू साडू आता विधानसभेत पोहोचले आहेत.माजी आमदार दिवंगत मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांच्या दोन कन्या पैकी शैलजा या जयंतराव यांच्या तर रेणुकादेवी या सत्यजित यांच्या पत्नी आहेत. १९९५ मध्ये राजकीय घडामोडी घडल्या यामध्ये दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी न देता शंकरराव चरापले यांना उमेदवारी दिली. यामुळे संपूर्ण राजकारण फिरले आणि देशमुख यांच्या कडे असणारी १९७८ पासून आमदारकी नाईक घरात गेली.१९९९ मध्ये सत्यजित यांना काँग्रेस ची उमेदवारी मिळाली मात्र त्यावेळी अपयश आले.२००४ ला अपक्ष व २०१४ ला काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.या तीनही निवडणुकीत अपयश आले.यानंतर त्यांनी काँग्रेस ला रामराम ठोकला आणि भाजप मध्ये प्रवेश केला. या अगोदरच शिवाजीराव नाईक यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.सत्यजित यांनी भाजप प्रवेश केला आणि शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक गट एकत्र आले. याचबरोबर या मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस जवळजवळ हद्दपार झाली.२०१९ मध्ये सत्यजित यांनी भाजपला साथ दिली मात्र यावेळी शिवाजीराव नाईक यांना अपयश आले. दोनवेळा वसंतराव नाईक म्हणजे नाईक घराण्याकडे असणारी आमदारकी १९७८ पासून १९९५ पर्यंत देशमुख त्यानंतर १९९५ पासून २०२४ पर्यंत नाईक घराण्याकडे आमदारकी राहिली.यावेळी पुन्हा देशमुख घराण्याकडे ही आमदारकी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंतराव तर भाजपचे सत्यजित हे साडू साडू विधानसभेत पोहोचले आहेत.भाजप प्रवेश अन् आमदारकी
- सत्यजित यांनी १९९९ , २००४ , २०१४ मधील दोनवेळा काँग्रेस व एकवेळा अपक्ष निवडणूक लढवली मात्र यामध्ये त्यांना अपयश आले.
- शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर सत्यजित यांची काँग्रेस मध्ये होणारी घुसमट यामुळे भाजप प्रवेश केला.अखेर भाजप प्रवेश त्यांना आमदारकी मिळवून दिला.