इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना तांबवे (ता. वाळवा) येथील जयंत रामचंद्र पाटील (वय ३५) याने अर्वाच्य भाषा वापरून चाकणकरांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली. त्याच्याविरोधात पुणे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही या तरुणाने आमदार प्रणाली शिंदे यांना थेट फोन करून लग्नाची मागणी घातल्याची चर्चा आहे. हा जयंत पाटील मेंटल असल्याचे तेथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या तरुणाची घरची परिस्थिती बेताची आहे. वडील शेतकरी आहेत. त्याने बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. तांबवे हे वाळवा तालुक्यात असले तरी, ते शिराळा मतदारसंघात येते. त्यामुळे जयंत पाटील याने गत विधानसभाही लढवली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातूनही त्याने निवडणूक लढवली होती. पाटील याच्यावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू असल्याचे समजते.
रूपाली चाकणकर यांना धमकावणारा तांबवेचा जयंत पाटील मानसिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:19 AM