शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

Jayant Patil: जयंतरावांचे नवे डाव, नवे दावे, सांगलीतून... विधानसभा की लोकसभा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 6:27 PM

जयंतरावांनी दोन-तीन वर्षांपासून थोरल्या मुलाला राजकीय वारसदार म्हणून पुढं आणलंय. प्रतीक यांच्यासाठी स्वत:चा इस्लामपूर मतदारसंघ द्यायची त्यांची तयारी असेलच, पण स्वत:साठी मात्र अजून ते अंदाज घेताहेत.

श्रीनिवास नागे

स्वत:चा सुरक्षित मतदारसंघ मुलाला द्यायचा आणि आपण स्वत: शेजारच्या सांगली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायची, याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील अंदाज घेताहेत. त्यांची सावध पावलं जतकडून सांगली शहराकडं वळलीत. मात्र त्यांनी लोकसभाच लढवली, तर सहज मैदान मारता येईल, असंही सांगितलं जातंय.

जयंतरावांनी दोन-तीन वर्षांपासून थोरल्या मुलाला राजकीय वारसदार म्हणून पुढं आणलंय. प्रतीक यांच्यासाठी स्वत:चा इस्लामपूर मतदारसंघ द्यायची त्यांची तयारी असेलच, पण स्वत:साठी मात्र अजून ते अंदाज घेताहेत. सुरुवातीला त्यांची नजर जत मतदारसंघावर होती. त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये गेलेले बडे मोहरे आपल्याकडं वळवले. तिथं वडील दिवंगत राजाराम बापूंचे बक्कळ अनुयायी. शिवाय विरोधी भाजपची धार बोथट झालेली. जतचा बंद पडलेला डफळे साखर कारखाना जयंतरावांच्या कारखान्यानं चालवण्यास घेतलेला.

जलसंपदा विभागाकडून पूर्व भागातल्या गावांना म्हैसाळच्या विस्तारित योजनेतून सातशे कोटी खर्चून पाणी देण्याची तयारी चालवलेली. सगळं अनुकूल वाटत होतं. पण, काँग्रेसचा अडसर दिसू लागला. तिथले आमदार विक्रम सावंत काँग्रेसचे. ते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मावसभाऊ. विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडी झाली तर मतदारसंघ काँग्रेस सोडणार नाही. तो तर कदम यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. त्यामुळं जयंतराव जतबाबत तूर्त थांबले असावेत.

शिराळ्याचाही पर्याय चाचपण्यात आला. तिथं मानसिंगराव नाईक राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांना जिल्हा बँकेचं अध्यक्षपद दिलंय. अलीकडंच कट्टर विरोधक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना भाजपमधून राष्ट्रवादीच्या तंबूत घेतलंय. शिराळा मतदारसंघात वाळव्यातली ४८ गावं आहेत. पण तिथं महाडिक गटाचा जोरदार विरोध होऊ शकतो. शिवाय जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार वाढवायचे असतील तर शिराळ्यापेक्षा दुसरा मतदारसंघ पहावा, यातून सांगलीचा पर्याय पुढं आला.

सांगली मतदारसंघात सन १९८६ पासून आतापर्यंत केवळ एकदाच काँग्रेसनं आणि एकदा अपक्ष असलेल्या मदन पाटलांनी बाजी मारलेली. काँग्रेसनं सातत्यानं हाराकिरी पत्करल्यामुळं आता राष्ट्रवादी या जागेवर दावा करू शकते. काँग्रेसमध्ये गटबाजी जादा, त्यामुळं तिकिटासाठी साठमारी ठरलेलीच. विधानसभेवेळी महाआघाडी झाली तर राष्ट्रवादीचा दावा आणि नवा चेहरा पुढं करता येईल, जागावाटपही ‘मॅनेज’ करता येईल, अशी अटकळ जयंतरावांनी बांधली असावी.

मुख्यमंत्री होण्याची जयंतरावांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ते जाहीरपणानं सांगत नाहीत इतकंच! पण तिथं अजित पवारांसारखा खमक्या अडसर आहे. पक्षातलं वजन वाढलं पाहिजे, स्वत:च्या आमदारांची संख्या नजरेत भरली पाहिजे, हे त्यांना पक्कं ठाऊक आहे. त्यामुळं जिल्ह्यात काँग्रेस-भाजपला दाबत आपली ताकद वाढवण्यासाठी ते नवा आमदार देतीलही.. अर्थात तो डावही हुकायला लागला तर खासदार तरी आपल्या पक्षाचा हवा, हेही त्यांचं लक्ष्य असेल. हा खासदार त्यांच्या घरातला असेल, किंवा ते स्वत:च असतील! त्यांना स्वत:ला खासदारकीत काडीचाही रस नाही, परंतु भविष्यात सारीपाटावरच्या सोंगट्याच तशा हलल्या तर..?

सांगली शहरात सातत्यानं ‘कार्यक्रम’

भाजपच्या ताब्यातली महापालिका मुठीत घेतल्यानंतर जयंतराव सातत्यानं सांगलीत सार्वजनिक आणि राजकीय ‘कार्यक्रम’ करताहेत. २००८ मध्ये त्यांनी महापालिकेत महाआघाडीचा डाव यशस्वी केला होता. तशीच जुळवाजुळव सुरू आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी चकचकीत रस्त्यांपासून उद्यानं, मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांपर्यंतचे घाट घातले जाताहेत.

काँग्रेस आणि भाजपलाही चुचकारलं!

सांगली शहरात राष्ट्रवादीतल्या कुरबुरीवर जयंतरावांनी मात्रा शोधलीय. कुणी काय करायचं, हेच आखून-रेखून दिलंय. काँग्रेसमधील मदनभाऊ गटाला वळवलंय, तर विश्वजित कदम गट मात्र अंतर राखून आहे. विशाल पाटील गट विरोधात असणार, हे स्वाभाविकच. जयंतरावांनी भाजपलाही चुचकारलंय. २००८ मधल्या महाआघाडीतले मोहरे हाती लागतील, अशी त्यांची खात्री आहे. नाही तरी जिल्ह्यातली भाजप त्यांचंच बोट धरून मोठी झालीय. ‘बीजेपी’ नव्हे ‘जेजेपी’ (जयंत पाटील पार्टी) असं खुद्द भाजपचे नेतेच म्हणत होते. तो पैरा आता फेडावा, अशी त्यांची अपेक्षा असणारच. मागच्या आठवड्यात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुढील वेळी आपणच उभं राहणार, असं ठणकावून सांगितलं. भाजपमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांसाठी तो इशारा तर नव्हता?

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभाlok sabhaलोकसभा