फोटो-०४इस्लामपूर
फोटो ओळी- राजारामनगर येथे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आरोग्य व शैक्षणिक मदतीचे धनादेश वितरण प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, आयुब बारगीर, इलियास पिरजादे, उज्ज्वला पाटील आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान समाजातील दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांचा आधार बनत आहे, हे पाहून समाधान वाटते, अशी भावना युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली.
राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या वतीने दारिद्र्यरेषेखालील २२ कुटुंबांना आरोग्य व शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली, तसेच दोन दिव्यांगांना तीन चाकी सायकल व साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
पाटील म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले अभियान तालुक्यातील प्रत्येक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबापर्यंत पोहोचले असून या कुटुंबांच्या प्रगतीचे साधन बनले आहे. आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार, व्यसनमुक्ती व विविध योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळवून दिला जात आहे.
यावेळी संचालक संभाजी पाटील, माजी नगरसेवक आयुब बारगीर, जयंत दारिद्र्य अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, उज्ज्वला पाटील उपस्थित होत्या.
चौकट
अभियान दोन राज्यात प्रथम..!
सलाम बॉम्बे या संस्थेने तंबाखूमुक्तीचे प्रबोधन करणाऱ्या संस्थांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील अनेक स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमात जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान प्रथम आले आहे. यापूर्वीही अभियानला सलाम बॉम्बेकडून पाच लाख रुपयांचा तंबाखूमुक्तीचा पुरस्कार मिळाला आहे.