सांगली : महापालिका क्षेत्रातील साडेनऊ कोटीच्या विकासकामाच्या उद्घाटन कार्यक्रमांत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या भाजप प्रेमांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वागत केले. मात्र दुसरीकडे भाजपचेच खासदार संजयकाका पाटील सध्या बिझी असतात, अशी टिप्पणी करीत त्यांची गैरहजेरीच्या चर्चेला विराम देण्याचा प्रयत्नही केला.मिरजेतील एका कार्यक्रमांत महापौर गीता सुतार यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना उद्देशून तुम्ही आशिर्वाद दिला तर शहराचा आणखी विकास करू, असे वक्तव्य केले होते. तो धागा पकडत जयंतरावांनीही भाजपचे नेते शेखर इनामदार व मकरंद देशपांडे यांचे आपल्यावर विशेष प्रेम असल्याची टिप्पणी केली. इनामदार यांनी २००८ पासून जयंतरावांशी मित्रत्वाचे संबंध असून त्यांच्या प्रेमाचा विकासकामांसाठी उपयोग करू, असे म्हटल्याने भाजपमध्ये अस्वस्थता होती.गुरुवारी विकासकामांच्या उद््घाटनानिमित्त सांगलीत आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जयंतरावांच्या प्रेमाबद्दल विचारता त्यांनीही त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. पाटील म्हणाले की निवडणुका या महिन्याभरासाठी असतात. त्यानंतर पाच वर्षात सर्वांनी एकत्र येऊन विकासकामे केले पाहिजेत. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे सांगितले.तर दुसरीकडे या कार्यक्रमाकडे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना पाठ फिरविल्याचे निदर्शनास आणून देताच त्यांचीही बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. खा. पाटील यांच्यावर केंद्र सरकाराच्या विविध समित्यांची जबाबदारी आहे. या समित्यांच्या बैठका असतात. त्यात ते बिझी आहेत, असा खुलासाही केला.
जयंतरावांच्या भूमिकेचे स्वागत, संजयकाका मात्र गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 7:22 PM
Politics, MuncipaltyCarporation, BJP, chandrakant patil, Sangli महापालिका क्षेत्रातील साडेनऊ कोटीच्या विकासकामाच्या उद्घाटन कार्यक्रमांत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या भाजप प्रेमांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वागत केले. मात्र दुसरीकडे भाजपचेच खासदार संजयकाका पाटील सध्या बिझी असतात, अशी टिप्पणी करीत त्यांची गैरहजेरीच्या चर्चेला विराम देण्याचा प्रयत्नही केला.
ठळक मुद्देजयंतरावांच्या भूमिकेचे स्वागत, संजयकाका मात्र गैरहजर भाजपमधील अस्वस्थतेला चंद्रकांत पाटील यांचा विराम