शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

जयंतराव-पतंगराव एकत्र

By admin | Published: February 26, 2017 12:43 AM

भाजपला शह देण्याची रणनीती : जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी हालचाली गतिमान

सांगली : जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना शनिवारी कलाटणी मिळाली. सर्वाधिक जागा पटकावणाऱ्या भाजपने सत्तेसाठी तयारी सुरू केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम व जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी आघाडीची मोट बांधून आवश्यक संख्याबळ गाठण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.जिल्हा परिषदेतील ६० पैकी २५ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी त्यांना अजून सहा जागांची आवश्यकता आहे. वाळवा तालुक्यातील रयत विकास आघाडीच्या चार जागाही आपल्याच असल्याचा दावा भाजपने आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला असला तरी या आघाडीतील नानासाहेब महाडिक गटाने भाजपशी बांधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही भाजपला पाठिंबा देण्यास विरोध केला आहे. त्यांच्या संघटनेकडेही जिल्हा परिषदेचा एक सदस्य आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या गटाने तीन जागा जिंकल्या असून, त्यांनी अजून पत्ते खुले केलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी आघाडी बनविण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादीकडे १४, तर काँग्रेसकडे १० सदस्य आहेत. बागणीतून निवडून आलेले अपक्ष संभाजी कचरे मूळ जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने दोन जागा जिंकल्या असून त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिरज पश्चिम भागात काँग्रेसशी आघाडी केली होती. रयत विकास आघाडीतील वैभव नायकवडी गटाशी आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याशी पतंगराव कदम व मोहनराव कदम यांची जवळीक आहे. ही सर्व गोळाबेरीज केली तर ३२ सदस्यसंख्या गाठून सत्तेपर्यंत पोहोचता येते, असे आडाखे बांधून जयंत पाटील आणि कदम बंधूंनी हालचाली सुरू केल्याचे समजते. त्यांच्यामध्ये तशी चर्चा झाली आहे. वैभव नायकवडी आणि आ. बाबर यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी मोहनराव कदम यांच्यावर देण्यात आली आहे. मोहनराव कदम यांचा पुढाकारभाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे चुलतबंधू संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. देशमुख आणि कदम गटाचे हाडवैर सर्वश्रुत आहे. पतंगराव कदम यांचा स्वत:चा विधानसभा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या आठपैकी केवळ एक जागा कदम गटाला जिंकता आली आहे. संग्रामसिंह देशमुख जर अध्यक्ष झाले, तर भविष्यात कदम गटाला आणखी मोठा धोका संभवतो. त्यामुळेच भाजपला शह देण्यासाठी कदम बंधूंनी हालचालींना सुरुवात केल्याचे बोलले जाते.एकत्र बसून निर्णयशनिवारी सायंकाळी पेठनाका येथे रयत विकास आघाडीची बैठक झाली. खा. राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सी. बी. पाटील, राहुल महाडिक बैठकीस उपस्थित होते. मंत्री सदाभाऊ खोत अनुपस्थित होते. रयत आघाडीचे सगळे नेते एकत्र बसून पाठिंब्याचा निर्णय घेतील, असे ठरल्याचे सांगण्यात आले.पृथ्वीराज देशमुख यांची महाडिकांकडे धावरयत आघाडीची बैठक झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सायंकाळी पेठनाक्याकडे धाव घेतली. तेथील पॉलिटेक्निकमध्ये नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक यांच्यासह आ. शिवाजीराव नाईक आणि सी. बी. पाटील यांची त्यांनी भेट घेतली. देशमुख यांच्याकडून महाडिक यांचे मन वळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.