मुंबई येथे प्रदेश युवा मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यावेळी
प्रदेशाध्यक्ष
विक्रांत पाटील व उपाध्यक्ष राहुल महाडिक
यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. निवडीनंतर जयराज पाटील म्हणाले की, भाजपने युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यस्तरावर काम करण्याची संधी दिली आहे. यापुढील काळात जास्तीत जास्त युवकांना युवा मोर्चामध्ये सहभागी करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.
यावेळी प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, सरचिटणीस राहुल लोणीकर, जगन्नाथ पाटील, प्रवीण फोंडे उपस्थित होते.
फोटो ओळी : कामेरी (ता. वाळवा) येथील जयराज पाटील यांना भाजयुमोच्या प्रदेश सचिवपदी निवडीचे पत्र देताना प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व उपाध्यक्ष राहुल महाडिक, सुशील मेंगडे, राहुल लोणीकर.