शिरटे : सध्याच्या कोरोना काळात हॅन्ड सॅनिटायझरचे वाढलेले महत्व लक्षात घेऊन धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखानाही हॅन्ड सॅनिटायझर निर्मितीच्या क्षेत्रात उतरला आहे. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर २ केएलपीडी क्षमतेच्या हॅन्ड सॅनिटायझर प्रकल्पाचे उद्घाटन संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
हे हॅन्ड सॅनिटायझर ‘इरेझॉल’ या ब्रँड नावासह लवकरच बाजारात दाखल होणार आहे. याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, फर्न हॉटेलचे अक्षय सुर्वे, अजय सुर्वे, जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, कृष्णाचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी उपस्थित होते. दरम्यान, जयवंत शुगर्सच्यावतीने साकारण्यात आलेल्या ४८ मेट्रिक टन क्षमतेच्या सीओ-२ प्रकल्पाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जयवंत शुगर्सचे एन. एम. बंडगर, आर. आर. इजाते, जी. व्ही. हराळे, एस. एच. शेख, आर. के. चन्ने, एन. जे. कदम, आर. टी. सिरसाट, ए. एल. काशीद, एस. एच. भुसनर, आर. जे. पाटील, जे. पी. यादव, पंकज पाटील, मनोज गायकवाड उपस्थित होते.
फोटो- २४१२२०२०-आयएसएलएम-जयवंत शुगर न्यूज
फोटो ओळ : धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्सच्यावतीने साकारण्यात आलेल्या हॅन्ड सॅनिटायझर निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, अक्षय सुर्वे, अजय सुर्वे, सी. एन. देशपांडे, सूर्यकांत दळवी उपस्थित होते.