शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

नागेवाडी गटातून जितेश कदम यांची चर्चा

By admin | Published: October 06, 2016 11:46 PM

जिल्हा परिषद निवडणूक : खानापूर काँग्रेसमधून एकमत, राष्ट्रवादी काँग्रेसचीही मूक संमती

दिलीप मोहिते -- विटा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक गट व गणातून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. खानापूर तालुक्यातील नागेवाडी जिल्हा परिषद गटातून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश (भैया) कदम यांनी कॉँग्रेसमधून निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू झाली असून, खानापूर तालुका कॉँग्रेसनेही जितेश यांच्या नावावर एकमत केल्याचे समजते. राष्ट्रवादीचीही त्यांच्या नावाला संमती असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.नागेवाडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण खुला झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी अपेक्षित आहे. या गटावर शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी खानापूर तालुका कॉँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गुरूवारी मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कॉँग्रेसने शिवसेनेला प्रतिस्पर्धी ताकदीचा उमेदवार देण्यासाठी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश कदम यांच्या नावावर एकमत करून त्यांनाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.डॉ. जितेश कदम यांचे आजोळ खानापूर तालुक्यातील पारे असून, प्रतापराव साळुंखे यांचे ते नातू आहेत. खानापूर तालुक्याच्या विभाजनापूर्वीपासून कदम कुटुंबियांचा या तालुक्यात चांगला संपर्क आहे. उदगिरी शुगरच्या माध्यमातून कदम कुटुंबाने खानापूरचे नाते जास्तच दृढ केले आहे. त्यातच डॉ. जितेश यांचा कडेगावसारखाच खानापूर तालुक्यातही चांगला संपर्क असून, त्यांनी युवा संघटनही मजबूत केले आहे. विटा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यक्रमात डॉ. जितेश यांचा सहभाग आहे. त्यामुळे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी नागेवाडी जिल्हा परिषद गटातून कॉँग्रेसच्यावतीने डॉ. जितेश कदम यांना उमेदवारी देण्याबाबत तालुक्यातील कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. खानापूर तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष रवींद्रअण्णा देशमुख यांचे माधळमुठी हे गावही नागेवाडी जिल्हा परिषद गटात आहे. त्यामुळे कॉँग्रेसचा असलेला संपर्क आणि युवा संघटन या दुहेरी पटावर डॉ. जितेश यांनीच नागेवाडीतून निवडणूक लढवावी, असा आग्रह कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे.डॉ. जितेश कदम यांनी नागेवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी केल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे डॉ. कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. याबाबत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याशी संयुक्तिक चर्चा करण्यात येणार असून, डॉ. जितेश यांनाच उमेदवारी देण्यासाठी मोहनराव कदम यांना आग्रह करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात नागेवाडी जिल्हा परिषद गटातून डॉ. जितेश कदम यांच्या उमेदवारीसाठी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.मोहनराव दादांचा निर्णय अंतिम...खानापूर तालुक्यातील नागेवाडी जिल्हा परिषद गटातून मी निवडणूक लढवावी, असा कॉँग्रेस कार्यकर्त्यांतून मतप्रवाह येत असला तरी, याबाबतचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते मोहनराव कदम घेणार आहेत. त्यांचा निर्णय मला अंतिम राहणार आहे. नागेवाडी जिल्हा परिषद गटातून दादांनी मला हिरवा कंदील दिल्यास मी येथून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे मत कॉँग्रेसचे युवक नेते डॉ. जितेश कदम यांनी गुरूवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.