सांगली : शहरात घरफोडीसह जबरी चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख २२ हजारांसह दुचाकी असा पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अधिक माहिती अशी, गेल्या आठवड्यात विजयनगर येथील फाइव्ह स्टार फायनान्स कंपनीचे शोरूम फोडून रोकड लंपास करण्यात आली होती. ती संशयित अल्पवयीन मुलाने लंपास केल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली होती. त्यानुसार मुलाच्या घरी पोलिसांनी झडती घेतली, त्यावेळी रोकड मिळून आली. संशयित मुलाने साथीदाराच्या मदतीने वानलेसवाडी येथे जबरी चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. विश्रामबागचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.