इस्लामपूर : कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यातील संशयितांविरुध्द कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेले कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासनाने विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने जमावबंदी आदेश लागू असल्याचे कारण देत या आंदोलनास परवानगी नाकारल्याचे समितीचे निमंत्रक दिग्विजय पाटील यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून येथील प्रशासकीय इमारतीमधील तहसील कार्यालयासमोर कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन समितीच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले. महारयत अॅग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनाचे आमिष दाखवत हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या घोटाळ्यात फसवणूक झालेले शेतकरी कडकनाथचे पक्षी वाचविण्यासाठी जिवापाड प्रयत्न करत आहेत. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत या शेतकऱ्यांना झालेली नाही.
या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एमपीआयडी कायद्यांतर्गत स्वतंत्र चौकशी अधिकाºयाची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळेच हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. परंतु प्रशासनाने आंदोलनास परवानगी नाकारत गुरुवारी दुपारी चार वाजता चर्चा करण्यासाठी बोलावल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.0९१0२0१९— आयएसएलएम— कडकनाथ न्यूजइस्लामपूर येथे कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीच्यावतीने नायब तहसीलदार सुनील ढाले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आष्ट्याचे अप्पर तहसीलदार शेरखाने, दिग्विजय पाटील, सागर गाताडे, किरण शिंदे, संजय निकम उपस्थित होते.