सांगली : सांगलीत दोन दिवस चाललेल्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपदाचा पीएनजी महाकरंडक पटकावला. भावे नाट्यगृहात पार पडलेल्या स्पर्धेत राज्यभरातून संघांनी सहभाग घेतला.कदम महाविद्यालयाच्या संघाने ‘माई’ एकांकिका सादर केली. कथा, अभिनय, प्रकाशयोजना, संगीत आदी सर्वच बाबतीत सरस ठरली. इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीची ‘व्हाय नॉट’ उपविजेती ठरली. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या ‘स्किम’ने तिसरा क्रमांक पटकाविला. कोल्हापुरातील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या ‘पिंडग्रान’ला चौथा क्रमांक मिळाला. अन्य पुरस्कार असे : दिग्दर्शन - महेश गवंडी (माई), श्रेयश, शिरीष (स्कीम), अभिषेक पवार (व्हाय नॉट?).
पार्श्वसंगीत - प्रसाद पोतदार (यात्रा, डीआरके, कोल्हापूर), साक्षी कांबळे (व्हाय नॉट?), मानसी, गणेश, वासुदेव (पडदा). प्रकाश योजना - आर्यन व्हनखेडे (उंच माझा झोका गं), अभिषेक स्वामी (यात्रा), निरंजन पाटील, विवेक जाधव (पिंडग्रान). नेपथ्य - सुमित शेलार (इंद्रायणी, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे), हर्षल कांबळे (पॉझिटिव्ह, कला, वाणिज्य महाविद्यालय, नागठाणे), करण परदेशी (बी अ मॅन, आप्पासाहेब जेधे महाविद्यालय, पुणे).विजेत्या संघांना गाडगीळ सराफ पेढीचे संचालक मिलिंद गाडगीळ, राजीव गाडगीळ यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.यावेळी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेचे अध्यक्ष प्रा. भास्कर ताम्हनकर, श्रीनिवास जरंडीकर, शशांक लिमये, मकुंद पटवर्धन, शेखर रणखांबे, सुनील फडतरे, सनीत कुलकर्णी, योगेश वाटवे, प्रशांत जगताप, अंजली भिडे, प्रसाद गोखले, अपर्णा गोसावी, सचिन पारेख, मकरंद कुलकर्णी, चंद्रकांत धामणीकर, कुलदीप देवकुळे, विशाल कुलकर्णी आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून रवींद्र देशपांडे ( पुणे ), अनुया बाम (रत्नागिरी) यांनी काम पाहिले. पु. ना. गाडगीळ सराफ पेढीने स्पर्धांचे आयोजन केले.
सूचिता तारळेकर उत्कृष्ट अभिनेत्रीअभिनयासाठी सूचिता तारळेकर (माई), पूर्वा कारेकर (उंच माझा झोका गं, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली), श्रावणी मारकड (पडदा, न्यू कॉलेज, कोल्हापूर) यांना पारितोषिके देण्यात आली. अभिनय (पुरुष) - समर्थ तपकिरे (पिंडग्रान), सौमित्र कागलकर, (व्हाय नॉट?), ऋतिक रास्ते (फिर्याद, टी. जे. कॉलेज पुणे).