कामेरी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली एकरकमी करू नये, अशी मागणी करणारे निवेदन डॉ. रणजित पाटील युवा प्रतिष्ठानच्यावतीने सरपंच स्वप्नाली जाधव व ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार यांना राजेंद्र पाटील, विकास पाटील, रोहित वाकळे, विवेक कापसे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने चालूवर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी एकरकमी वसुलीसाठी नागरिकांना आग्रह न धरता कोरोना जागतिक महामारीमुळे शेतकरी, व्यापारी, व सर्वजण आर्थिक अडचणीत आहेत. याचा विचार करून २ टप्प्यात भरून घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन डॉ. रणजित पाटील युवा प्रतिष्ठानच्यावतीने सरपंच स्वप्नाली जाधव व ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार यांना राजेंद्र पाटील, विकास पाटील, रोहित वाकळे ,विवेक कापसे यांनी दिले आहे .
तसेच कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राने मुख्य आरोग्य केंद्राबरोबरच गावातील इतर २ उपकेंद्रे व बाजारपेठेत ग्रामपंचायत कार्यालयानजीक लसीकरण केंद्र सुरू करावे, कारण आरोग्य केंद्र गावापासून खूप दूर आहे. वयोवृद्ध लोकांना त्या ठिकाणी जाणे अवघड होते. एकाच ठिकाणी लसीकरण, अँटिजेन टेस्ट इतर कारणांसाठी त्या ठिकाणी होणारी गर्दी टाळता येईल. यासाठी डॉ. रणजित पाटील युवा प्रतिष्ठान लागेल ती मदत करायला तयार आहे