शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
2
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
3
Share Market Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात जोरदार खरेदी; Sensex-Nifty मध्ये तुफान तेजी
4
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
5
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
6
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
7
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
8
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
10
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
11
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
12
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
13
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
15
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
16
भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
17
ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
19
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
20
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट

करंजेत शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By admin | Published: October 03, 2016 12:36 AM

अल्पवयीन विद्यार्थीही सहभागी : विटा पोलिसांत गुन्हा दाखल

विटा : करंजे (ता. खानापूर) येथील विद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील शिक्षक व एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शेतात व शाळेतीलच एका अडगळीच्या खोलीत अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोघांवर रविवारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुरू व शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खानापूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जी. डी. गायकवाड (रा. शेटफळे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करंजे येथील विद्यालयात तो इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे. याच विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीला गायकवाड याने दि. २२ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास जेवणाच्या सुटीत घरी जात असताना ‘तुझ्या पप्पांनी तुला बोलावले आहे’, असे खोटे सांगून विद्यालयाच्या बाजूला असलेल्या शेतात नेले. त्यावेळी गायकवाड याच्यासोबत शाळेतील आठवीच्या वर्गातील एक विद्यार्थीही होता. या दोघांनी शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दि. २७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अत्याचार केलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने मुलीला शाळेतील सातवीच्या वर्गाच्या बाजूला असलेल्या अडगळीच्या खोलीत नेले. घरच्या लोकांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. या घटनेनंतर मुलगी शाळेत असताना तिला चक्कर आली. रुग्णवाहिकेतून तिला करंजे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथून तिला विटा येथील खासगी रग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी मुलीने तिच्या वडिलांना गायकवाड व शाळेतील एका मुलाची भीती वाटत असल्याचे सांगितले. त्यावेळी वडील व तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, मुलीने घडलेली हकीगत सांगितली. याप्रकरणी रविवार, दि. २ आॅक्टोबरला गायकवाड व संबंधित अल्पवयीन संशयिताविरुध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शिक्षक गायकवाड हा फरारी झाला आहे. दरम्यान, गुरू व शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेचे तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. विटा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांनी रविवारी दिवसभर या प्रकरणाची सखोल चौकशी केली. (वार्ताहर) गायकवाड फरार शिक्षक गायकवाड याचे मूळ गाव आटपाडी तालुक्यातील शेटफळे असून, रविवारी पोलिसांनी शेटफळेसह अन्य ठिकाणी गायकवाड याचा शोध घेतला. परंतु, तो फरार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घोंगडे यांनी सांगितले.