शिराळा : शिराळा तालुक्यात शनिवारी १०० अँटिजेन चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळून आले. तालुक्यात आता ११ रुग्ण उपचाराखाली आहेत.
शनिवारी तडवळे व अंत्री खुर्द येथे प्रत्येकी १ असे नवीन २ रुग्ण आढळून आले. आत्तापर्यंत तालुक्यातील ९८ पैकी ९३ गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. आतापर्यंत तालुक्यात २ हजार १८८ रुग्ण आढळून आले असून, यापैकी २ हजार ९१ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या होमआयसोलेशन मध्ये ८, तर उपजिल्हा रुग्णालयात ३ असे ११ रुग्ण उपचाराखाली आहेत. आजअखेर शिराळा शहरातील १४ रुग्णांसाह तालुक्यातील ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण ४.२ टक्के आहे.