ते म्हणाले, मागील आर्थिक वर्षात महापूर आणि त्यापाठोपाठ कोरोनामुळे झालेली व्यवहार बंदी व जागतिक मंदी अशा विपरीत परिस्थितीतही संस्थेने चांगली कामगिरी केली आहे. ढोबळ नफ्यातून राखीव निधीसह विविध कारणासाठी निधीचा वापर केला आहे. ठेवी ५५६ कोटी ६५ लाख झाल्या आहेत. कर्ज वाटप ४११ कोटी ८५ लाख, वसूल भागभांडवल २१ कोटी ७३ लाख, अन्य बँकातील गुंतवणूक १८३ कोटी ६४ असून खेळते भांडवल ६४१ कोटी आहे. एकूण व्यवसाय एक हजार कोटीपर्यंत गेला आहे. ढोबळ एनपीए १.५५ टक्के असून नेट एनपीए शून्य टक्के आहे.
उपाध्यक्षा भारती आप्पासाहेब चोपडे, संचालक ॲड. एस. पी. मगदूम, डॉ. नरेंद्र खाडे, डॉ. रमेश ढबू, लालासाहेब थोटे, ओ. के. चौगुले, वसंतराव नवले, ललिता सकळे, डॉ. एस. बी. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम उपस्थित होते.
चौकट
संस्थेचा चढता आलेख
रावसाहेब पाटील संस्थेचे अध्यक्ष झाल्यापासूनच्या कालखंडात ठेवीमध्ये ८१ टक्के, कर्जात ८० टक्के, नफ्यात ९५ टक्के, भागभांडवलात ५० टक्के, निधीमध्ये ४० टक्के, गुंतवणुकीत ७५ टक्के इतकी भरघोस वाढ झाली आहे. संस्था सांगली, कोल्हापूर, सातारा कार्यक्षेत्रात ५१ शाखांच्या माध्यमातून आधुनिक सेवा प्रदान करीत आहे. सांगली येथील आधुनिक कार्यालय लवकरच लोकसेवेत येणार आहे.