शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: ..अन्यथा कर्नाटकात जाऊ!, उमदी येथे पाणी संघर्ष समितीने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 5:29 PM

शिंदे सरकारने आमची दखल घेतली नाही तर आम्ही कर्नाटकात जायला तयार

उमदी : जर महाराष्ट्र शासनाने आम्हाला पाणी नाही दिले, तर आम्ही कर्नाटकात जाऊ, असा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी शुक्रवारी येथे दिला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुका कर्नाटकात घेण्याबाबत केलेल्या विधानानंतर जत तालुक्यात पाणीप्रश्नावरून वादंग निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणी संघर्ष समितीची उमदी येथे सभा झाली.समितीचे अध्यक्ष पोतदार म्हणाले, अनेक वर्षे आम्ही पाण्यासाठी संघर्ष करत आहोत. मात्र महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्याने घेतले नाही. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जत पूर्व भागातील ४२ गावे कर्नाटकात घेणार, असे म्हणताच महाराष्ट्र शासन व विरोधी नेते जागे झाले. मात्र तुम्ही आम्हाला पाणी कधी देणार, हे उमदीत येऊन सांगा, अन्यथा आम्ही पुन्हा नव्याने प्रस्ताव घेऊन कर्नाटकात जाऊ. आम्ही पाकिस्तानात जात नाही, तर शेजारच्या राज्यातच जात आहोत. आमच्या भावना कर्नाटक सरकारला कळतात, मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना का समजत नाहीत?अनिल शिंदे म्हणाले, पाणी मिळाले नाही तर आम्ही शांत बसणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही किती आंदोलन केली, याचा अभ्यास करा. लोकांच्या भावना समजून घ्या. आम्ही तुम्हाला फक्त पाणी मागत आहोत. तुम्ही आम्हाला पाणी नाही दिले, तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहाेत.ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर म्हणाले, जयंत पाटील यांनी जलसंपदा मंत्री असताना सहा टीएमसी पाणी मंजूर केले आहे. मात्र पाणी येणार तेवढ्यात सरकार कोसळो आणि कामाला खीळ बसली. शिंदे सरकारने आमची दखल घेतली नाही तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहाेत.निवृत्ती शिंदे म्हणाले, आमदार विक्रम सावंत यांच्या विनंतीनुसार कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील त्यांच्यासाठी अतिरिक्त ठरलेले पाणी आम्हाला सोडतात. कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देते. वीज सवलत देते. महाराष्ट्राने आमच्या पाण्याची व्यवस्था नाही केली तर आम्ही रिट दाखल करून जनआंदोलन उभारू व कर्नाटकात जाऊ. यावेळी वहाब मुल्ला, मानसिद्ध पुजारी, नारायण ऐवळे, आण्णाप्पा आडवी, राजू कोळगिरी, दावल शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकjat-acजाटWaterपाणी