लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज सोसायटीस गतवर्षीच्या अहवाल सालात ३७ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष रमेश काशीद यांनी दिली. संस्थेच्या ऑनलाईन वार्षिक सभेत ते बोलत होते. यावर्षी ११ टक्के लाभांश प्रस्तावित करण्यात आला आहे.
कसबे डिग्रज सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. माजी अध्यक्ष बाळासाहेब मासुले यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सचिव संजय साळुंखे यांनी प्रोसिडिंग वाचन केले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक अजित आपटे, कुमार लोंढे, राजाराम चव्हाण, विपुल चौगुले यांनी उत्तरे दिली
यावेळी पीककर्ज माफी मिळावी, व्याजसवलत, महापूर नुकसानभरपाई बाबतीतही चर्चा करण्यात आली. चर्चेत वर्धमान अवधूत, शिवशांत चव्हाण, फिरोज तांबोळी, भानुदास सलगर, शोभा उदगिरे आदींनी सहभाग घेतला होता. अध्यक्ष रमेश काशीद यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष वंदना रेगे यांनी आभार मानले.
080921\img-20210907-wa0016.jpg
कसबे डिग्रज सोसायटी सर्वसाधारण सभा