प्रदीप पोतदारकवठे एकंद : येथील श्री सिद्धराजाचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने साकारण्यात येणारे शोभेचे दारूकाम मोठ्या उत्साहात भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. आसमंत उजळून टाकणारी नानाविध प्रकारच्या नयनरम्य आतषबाजीच्या वषार्वात तब्बल १३ तास पालखी सोहळा रंगला. प्रशासन व यात्रा कमिटी, ग्रामस्थ व दारू शोभा मंडळाकडून संयोजनाची चोखपणे जबाबदारी बजावली.
दसºयादिवशी रात्री नऊ वाजता श्री. मंदिरात पूजाअर्चा होऊन हजारो औंटांच्या सलामीने सोहळ्यास सुरूवात झाली. शिलंगण चौकात चव्हाण पाटील कट्टा येथे दसºयाचे सोने आपटा पूजन करण्यात आले. पालखीचे सर्व मानकरी, सेवेकरी, गुरव, पुजारी आदी भाविकांच्या उपस्थितीत ग्रामप्रदक्षिणेस प्रारंभ झाला. श्री सिद्धराज महाराज आणि श्री बिरदेव महालिंगरायाचा पालखी सोहळा नेत्रदीपक आतषबाजीची सलामी घेत पुढे पुढे सरकत होता.
श्री सिध्दराजाच्या पांढरीत भाविकांची जमलेली गर्दी, गर्दीतून उमटणारा ह्यहर हरह्णचा गजर, अवकाशात होणाº्या सोनेरी ठिणग्यांचा वर्षाव, विद्युतरोषणाईने सजवलेला अश्व, आरती- दिवटी, छत्र -चामर, पोषाखा व शस्त्रधारी सेवेकरी अशा दिमाखात दोन्ही पालख्या ह्यहर हरह्णच्या जयघोषात हजारो भाविकांच्या साक्षीने विजयादशमीचा सीमोल्लंघन पार पडला. मुजावर फ्रेंड सर्कलने पेट्रोल दरवाढीवर ह्यमहागाईचा भडकाह्णआतिषबाजीतून साकारला.
आझाद मंडळाकडून पाकिस्तानी दहशतवादी अतिरेकी हल्ला केला. तसेच फुगडी, मोर, दांडपट्टा, बुरूज, वेस, कागदी शिंगटे, सूर्य पान, झाडे अशा नेत्रदीपक पारंपरिक दारुकामाबरोबरच गोल्डनची वेस, सिध्दीविनायकचा सुर्य व ह्यआॅलिंपिक फायर शोण, आकाशदिप मंडळाचे सोनेरी ठिणग्यांचे झाडकाम, नवरंग, बसवेश्वर, सप्तरंग मंडळाचे रंगीत चक्रे, कोरे अड्डयाची लाकडी शिंगटे तर ए वन मंडळाकडून डिजिटल कारंजा साकारण्यात आला.
सुसंघ मंडळ, नवरंग, बसवेश्वर मंडळाकडून सप्तमुखी, पंचमुखी झाडकाम लक्षवेधी ठरले. हिंदमाता मंडळाचे पांढºया झाडकामाने डोळे दिपवले. तोडकर बंधू यांच्या नयनदीप मंडळाकडून ह्यसर्जिकल स्ट्राईकह्ण, जमादार मंडळाकडून राक्षस संहार, सिध्दराज फायर वर्क्सने पंचमुखी कारंजा, उगवता सुर्य, आकाशतारा मंडळाकडून ह्यचायनीज भस्मासुराचे दहन' करण्यात आले. आतषबाजीचा नजराणा सकाळी दहापर्यंत सुरूच होता. देवधरे येथे बहिणीच्या भेटीला कपिलमुनींच्या वास्तवस्थळी पूजाअर्चा होवून सकाळी दहा वाजता पालखी पळत मंदिरात आली. आ.सुमनताई पाटील यांनी देवालयात उपस्थित राहून श्री चे दर्शन घेतले.