कवठेमहांकाळ : तालुक्यातील पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी पारधी संघर्ष समितीच्या वतीने कवठेमंकाळ तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. आदिवासी पारधी संघर्ष समितीचे अध्यक्ष मलकार नवाशा काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. यावेळी संघटनेच्या वतीने तहसीलदार बी. जी. गोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पारधी समाजातील सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळावा, राहण्यासाठी दोन गुंठे जागा मिळावी, आधारकार्ड, जातीचे दाखले, जन्माचे दाखले, मतदान कार्ड, घरकुल व कसण्यास शेती मिळावी, राहण्यासाठी शासकीय घरकुल, गायरान जमिनीमध्ये प्रतिकुटुंब पाच एकर जमीन, पशुपालनची व्यवस्था, पारधी समाजातील अपंग विधवा व वृद्ध व्यक्तींना विविध सवलती मिळाव्यात, गॅस सिलिंडर द्यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
याेवळी झुंजार नेते, मलकार काळे, लचंडी काळे, अंकुल काळे, बाबू काळे, माला काळे, कलेपाव पवार, दशरथ पवार, धर्मेंद्र काळे, वर्षा पवार, दशरथ पवार उपस्थित होते.