शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

कवठेमहांकाळ तालुक्यात उसाचे क्षेत्र दुप्पट

By admin | Published: November 02, 2014 10:14 PM

साखर कारखान्याचा वनवास संपणार : तब्बल पंच्चावन्न टक्के क्षेत्र ओलिताखाली

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -दुष्काळी पट्ट्यातील महांकाली साखर कारखान्याची गेल्या अठ्ठावीस वर्षांची उसाबाबत होणारी परवड व प्रतीक्षा म्हैसाळ योजनेच्या पाण्याने संपुष्टात आणली असून, तालुक्यातील ५५ टक्के शेतीचे क्षेत्र म्हैसाळच्या पाण्याने ओलिताखाली आले अन् या भूभागाने हिरवागार शालू नेसला. तब्बल दहा हजार सातशे पन्नास एकर उसाचे क्षेत्र तालुक्यात झाले आहे. यामुळे महांकाली कारखान्याला कार्यक्षेत्रातच जवळजवळ तीन लाख ऐंशी हजार मेट्रिक टन ऊस गाळपासाठी मिळणार असल्याने महांकाली कारखान्याचा गेल्या २८ वर्षांचा उसासाठी सुरू असणारा वनवास यंदा संपला आहे. कवठेमहांकाळ तालुका राज्यात दुष्काळी तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. उजाड माळरान, तहानलेली धरणीमाता अन् हताश झालेला बळिराजा.. असे विदारक चित्र गेल्या पाच वर्षांपूर्वी तालुक्यात होते. परंतु २००९ ला माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे प्रतिनिधित्व या तालुक्याला मिळाले. आर. आर. पाटील यांनी सुरुवातीलाच तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हैसाळ योजना पूर्णत्वाकडे कशी जाईल यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे म्हैसाळ योजनेला गती तर मिळालीच; परंतु तालुक्यातील ५५ टक्के भूभाग म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे ओलिताखाली आला. सतत दोन वर्षे म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यातील शेतीला सोडले. तसेच ३२ कोटी वीजबिलही शासनाच्या कोट्यातून भरले. यामुळे शेतकऱ्यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागण केली. तब्बल दहा हजार ७५० एकर उसाचे क्षेत्र सध्या उपलब्ध झाले आहे. गेली २८ वर्षे महांकाली कारखाना दुष्काळाशी टक्कर देत तरला आहे. कारखान्याला कार्यक्षेत्रात पाण्याअभावी ऊस उपलब्ध नसल्याने विजापूर, सोलापूर, परांडा (उस्मानाबाद), कोल्हापूर, कर्नाटक, निपाणी येथून मोठ्या प्रमाणात ऊस आणावा लागत होता. या ऊस वाहतुकीवर साडेसात कोटी रुपये इतका मोठा वाहतूक खर्च महांकाली कारखान्याला करावा लागत असे. त्यामुळे कारखानदारी कर्जात, तोट्यात, शेतकऱ्यांना असमाधानकारक दर द्यावा लागे, असे चित्र होते. परंतु म्हैसाळच्या पाण्याने महांकाली कारखान्याचे व शेतकऱ्यांचेही नशीब पालटवले.‘महांकाली’च्या २१ कि.मी.च्या कार्यक्षेत्रातच दहा हजार सातशे पन्नास एकर उसाची लागण झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातूनच मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा महांकाली कारखान्याला होणार आहे.गतवर्षीच्या गळीत हंगामात चार हजार एकरांपैकी आठशे एकरावरील ऊस महांकाली कारखान्याकडे आला. यामधून १ लाख २७८ मेट्रिक टनाचे गाळप कार्यक्षेत्रातील उसापासून करण्यात आले. बाकीचा ऊस, चारा छावणी, केंपवाड, जत, सांगली या कारखान्यांकडे गेला. त्यामुळे ‘महांकाली’ला बाहेरून ऊस मोठ्या प्रमाणात आणावा लागला. चालू गळीत हंगामामध्ये दहा हजार सातशे पन्नास एकर ऊसक्षेत्र कार्यक्षेत्रात असल्यामुळे जवळजवळ तीन लाख पन्नास हजार टन गाळप कार्यक्षेत्रातील उसापासून महांकाली कारखाना करणार आहे. कारखान्याचे या गळीत हंगामातील चार लाख पन्नास हजार टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याने फक्त एक लाख टन गाळपासाठी बाहेरून ऊस आणावा लागणार आहे. परंतु हे ऊस आयातीचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने महांकाली कारखान्याला या गळीत हंगामात सोन्याचे दिवस आल्याचे स्पष्ट झाले आहे.बाहेरून शंभर ते २५० कि.मी. अंतरावरून ऊस महांकाली कारखान्याला आणावा लागत असे. यामुळे प्रत्येक हंगामात सात कोटी रुपयांच्या वर वाहतूक खर्च कारखान्याला करावा लागत असे. परिणामी कारखान्याला कर्ज काढावे लागले, तोटा सहन करावा लागला. शेतकऱ्यांना समाधानकारक दर देता आला नाही. परंतु या हंगामात कार्यक्षेत्रातच मुबलक ऊस मिळणार असल्याने कारखान्याचा तब्बल आठ कोटी रुपये इतका प्रचंड वाहतूक खर्च वाचणार आहे. या वाचलेल्या कोट्यवधी रुपयांच्या वाहतूक खर्चामुळे कारखान्याची कर्जफेड, शेतकऱ्यांना समाधानकारक दर देण्यास मदत होणार आहे. कार्यक्षेत्रात उसाची आवक वेळेत होणार असल्याने उसाची रिकव्हरी वाढून वेळेत गाळप होणार आहे व साखर उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. परिणामी ‘महांकाली’चा गेल्या २८ वर्षांचा उसासाठी भोगावा लागणारा वनवास संपला आहे.तालुक्यातील ५५ टक्के शेतीक्षेत्र म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून ओलिताखाली आले आहे. तालुक्याचा उर्वरित ४५ टक्के भूभाग तसेच ढालगावचा परिसर टेंभू व म्हैसाळच्या पाण्यापासून ओलिताखाली आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. येथील बळिराजाला सुखा-समाधानाचे दिवस आणल्याशिवाय उसंत घेणार नाही.- आर. आर. पाटील, माजी गृहमंत्रीम्हैसाळ योजनेच्या पाण्याने तालुक्यात बागायत पिकांसह ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली. तब्बल दहा हजार एकरावर ऊस लागण झाली आहे. यामुळे शेतकरी व महांकाली कारखान्याला सोन्याचे दिवस आले आहेत. कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढल्याने कारखान्याला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन होणार आहे. - विजय सगरे, अध्यक्ष, महांकाली साखर कारखानागेल्या साडेतीन वर्षांपाठीमागे आम्ही शेती विकून शहरात जायचे ठरवले होते. कारण जगायचे कसे, हा आमच्यापुढे मोठा प्रश्न होता. परंतु या दोन वर्षांत म्हैसाळ योजनेचे मुबलक पाणी आमच्या शेतीला मिळाल्याने चार एकर पडीक शेती ऊस पिकाने यावर्षी बहरली आहे. ही किमया फक्त म्हैसाळ योजनेच्या पाण्याने घडवून आणली आहे. - सुरगोंडा पाटील, शेतकरी, हिंगणगाव